कोरेगावमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदेंना मनसेची साथ

22
0
Share:

कोरेगावमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदेंना मनसेची साथ

कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना शिवसेना-भाजप युतीच्या विरोधकांची मोट बांधण्यात यश मिळाल्याचं दिसत आहे. मनसेच्या नेते-कार्यकर्त्यांनी शिंदे यांना आपला पाठिंबा दिला आहे.

कोरेगाव येथील मनसेचे तालुकाध्यक्ष सागर बर्गे, शहराध्यक्ष सुजित पवार आणि जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंच्या पाठीमागे ताकद उभी करून मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून आणण्याचा शब्द दिल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याने यंदा कोरेगावमधून राष्ट्रवादीचाच विजय होईल असा विश्वास शशिकांत शिंदेंनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

Share: