नवी मुंबई : शेतकऱ्यांचा नफा वाढेल या दृष्टीने काम करण्याची गरज 

24
0
Share:

मालाची खरेदी करताना ग्राहक १०० टक्के खर्च करत असेल तरी त्यातील ५० % वाटा हा शेतकऱ्याला मिळायला हवा ,मात्र  शेतकऱ्याला मिळणाऱ्या मोबदला हा २० ते ३० टक्के इतकाच आहे , त्यामुळे हे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे. त्यासाठी

बाजार समिती मध्ये ई  नाम सारखी प्रणाली राबविण्याची गरज आहे. ई  नाम मुळे बाजार समित्यांना हा टप्पा सहज पणे गाठता येणार आहे. यासाठी  तत्कालीन  व्यवस्था सुधारण्याची नितातान्त गरज असल्याचेच मत  पणन संचालक दीपक तावरे यांनी व्यक्त केले आहे. मुंबई बाजार समिती  मध्ये ई नाम अंतर्गत अत्याधुनिक  अश्या  असेईग लॅब आणि ई लिलाव गृहाचे उदघाटन आज करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहीन म्हणून ते बोलत होते.

सध्या सर्व जग डिजिटल झाले आहे ,सर्वच लोक ऑन  लाईन व्यवहार करतात .  या अस्पर्धे मध्ये शेतकरी हि मागे पडू नये आणि बाजार व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हि प्रणाली राबवली जात आहे .ग्राहकांना ज्या प्रमाणे सर्व सुविधा मिळतात त्याच प्रमाणे शेतकऱ्यालाही त्याचा माल  विकण्यासाठी  सर्व  पर्याय उपलब्ध व्हायला हवे .आणि याच हेतूतून इ नाव प्रणाली उभारली जात आहे त्यामुळे सर्वानी मिळून या बदलाच्या हेतूने काम करायला हवे असे मत यावेळी तावरे यांनी व्यक्त केले.

ई नाम  अंतरंगत सर्व बाजार समित्या एकत्र  जोडण्याचे  काम  केले जात आहे.  यामुळे सर्व व्यवहार डीजीटल पद्धतीने ,ऑन लाईन  करावे लागणार आहेत मात्र बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी या कार्य प्रणालीला पूर्वी पासून  विरोध केला आहे. त्यामुळे हि प्रणाली आमलात आणण्यास उशीर होत आहे , सर्वांचे सहकार्य मिळत नसल्याने हि योजना इथे मागे पडत आहे ,मात्र सर्वानी यात सहकार्य करून हि योजना यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन बाजार समिती प्रशासक सतीश सोनी यांनी केले आहे.

ई नाम प्रणाली राबविण्या बाबत पुणे बाजार समिती पाठोपाठ मुंबई बाजार समिती हि मॉडेल कमिटी म्हणून  जाहीर करण्यात आली आहे  त्यामुळे सर्वानी त्यास सहकार्य करावे असे आवाहन यावेळी कृषी पणन  मंडळाचे व्यवस्थापक सुनील पवार  यांनी  केले.

सध्या  राज्यात शेतकरयांची परिस्थिती अतिशय वाईट आहे . शेतमालाला  योग्य भाव मिळत नाहीय ,त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. याला कारण सध्याची असलेली व्यवस्था आहे. आत्ता बाजातर समित्या अस्तित्वात नसत्या तर शेतकऱ्यांची अवस्था आत्ता पेक्षाही वाईट झाली असती . शेतकऱ्यांच्या मालाला भाव  देण्याचे काम बाजार समिती करत आहेत . आणि आत्ता हि व्यवस्था आणखीन सक्षम करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे .अशी माहिती यावेळी बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण यांनी दिली .

अश्या प्रकारे ऑन लाईन मालाचा लिलाव करण्यासाठी ई  लिलाव गृह आणि मालाची प्रतवारी ,दर्जा ठरवणारी  लॅब उभारणार मुंबई बाजार समिती हि पहिली बाजार समिती  ठरली  आहे . या लिलाव गृहात  शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना ऑन लाईन पद्धतीने आपल्या मालाचा लिलाव करता येणार आहे तर ई  लॅब मध्ये मालाची गुणवत्ता दर्जा ठरवून मालाला भाव ठरवता येणार आहे .यातून शेतकऱ्याच्या मालाला चान्गला भाव मिळेल असा विश्वास बाजार समिती आणि कृषी पणन मंडळ यांना आहे ,

Share: