Nirmala Sitharaman | पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 18,700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात : अर्थमंत्री

17
0
Share:

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (FM Nirmala Sitharaman) यांनी 20 लाख कोटी रुपयाचं ‘स्वावलंबी भारत अभियान’ पॅकेज जाहीर केलं. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दोन दिवस पत्रकार परिषद घेत या पॅकेजची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी गरीब, शेतकरी, मजुरांसाठी मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये फेरीवाल्यांसाठी 5 हजार कोटी, प्रवासी मजुरांना कमी किमतीत राहण्याची व्यवस्था, मजुरांना आणखी 2 महिने मोफत धान्य या घोषणांचा समावेश आह. (FM Nirmala Sitharaman) त्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी अर्थमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत.

आज अर्थमंत्री शेती आणि शेतीपुरक व्यवसायांना आदार देण्यासाठी 8 महत्त्वाच्या घोषणा करणार आहेत. तसेच, 3 प्रशासन संबंधित घोषणाही करण्यात येणार आहे.

*लॉकडाऊन दरम्यान, 74,300 कोटींपेक्षा जास्त किंमतीची किमान आधारभूत खरेदी, पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 18,700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,400 कोटी रुपये : अर्थमंत्री

*गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांसाठी अनेक पावलं उचलण्यात आली : अर्थमंत्री

*लॉकडाऊनदरम्यान 74 हजार 300 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले, यातील 18700 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले : अर्थमंत्री

*भारत सर्वात मोठा दूध उत्पादक, सर्वात मोठा ज्यूट व डाळी उत्पादक देश आहे. ऊस, कापूस, भुईमूग, फळे, भाज्या व मत्स्यपालनात तिसर्‍या क्रमांकावर आहे. भारतीय शेतकर्‍याने खरोखर धीर धरला आहे : अर्थमंत्री

*केंद्रीय अर्थमंत्रालयाची पत्रकार परिषद, आज 11 घोषणा करणार, शेतकऱ्यांसंबंधित 8 तर प्रशासन संबंधित 3 घोषणा
अर्थमंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी पॅकेज जाहीर होणार
मत्स्यपालनासह शेती आणि त्यासंबंधित कामे करणाऱ्या व्यक्तींसाठी आज पॅकेज : अर्थमंत्री

20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज

कोरोना संकंटाचा सामना करताना नव्या संकल्पानुसार पंतप्रधान मोदी यांनी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारताचा संकल्प साकार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. हे पॅकेज 20 लाख कोटी रुपयांचं असेल, असे मोदींनी सांगितलं.

नुकतंच सरकारने कोरोना संकंटाशी संबंधित ज्या आर्थिक घोषणा केल्या होत्या. जे रिझर्व्ह बँकेचे निर्णय होते आणि आज ज्या आर्थिक पॅकेजची घोषणा होत आहे त्याला जोडलं तर हे पॅकेज जवळपास 20 लाख कोटींचं पॅकेज आहे. हे पॅकेज भारताच्या जीडीपीचं जवळपास 10 टक्के एवढे आहे. देशाच्या विविध वर्गांना यामार्फत आर्थिक सहकार्य मिळेल. 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज 2020 मध्ये स्वावलंबी भारतच्या अभियानाला एक वेगळी गती देईल. स्वावलंबी भारतच्या संकल्पाला सिद्ध करण्यासाठी या पॅकेजमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. हे पॅकेज कुटीर उद्योग, गृह उद्योग, लघु उद्योग अशा अनेकांसाठी आहे.

देशातील नागरिकांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी आणि श्रमिक मजुरांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे. हे आर्थिक पॅकेज प्रामाणिकपणे टॅक्स भरुन देशाच्या विकासात आपलं योगदान देणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी आहे. गेल्या सहा महिन्यात व्यवस्था सक्षम झाली. त्यामुळेच भारताच्या प्रत्येक (FM Nirmala Sitharaman) गरिबापर्यंत केंद्र सरकारची आर्थिक मदत पोहोचली.

Share: