Nisarga Cyclone: चक्रीवादळाचा धोका वाढला; मुंबईसह किनारपट्टीवर रेड अलर्ट

52
0
Share:

 

मुंबई-कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 3 जूनला चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता आहे. या वादळाचे ‘निसर्ग चक्रीवादळ’ असे नामकरण करण्यात आले आहे.

1. निसर्ग चक्रीवादळ 3 जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारीपट्टीवर पोहोचण्याचा इशारा
2. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात सतर्कतेचा इशारा
3. मच्छिमारांना समुद्रातून परत बोलवण्यात आले आहे, जीवितहानी होणार नाही, हे पाहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
4. मदत आणि बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या 16 पैकी 10 तुकड्या तैनात, 6 तुकड्या राखीव
5. कच्चा घरात राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी दवंडी आणि लाउडस्पीकरने सूचना, पक्की निवारागृहे तयार
6. मदत आणि बचावकार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना, नॉन कोविडसाठी रुग्णालये उपब्लध करण्याचे निर्देश
7. वीज पुरवठा खंडित होणार नाही, तसेच पालघर आणि रायगडमधील रासायनिक कारखाने, अणुऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी
8. वादळामुळे झाडे पडणे, भूस्खलन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता पाहून प्रशासनाला खबरदारी घेण्याचे निर्देश
9. मुंबईच्या सखल भागातील झोपड्डपट्टीवासियाना स्थालांतरित करण्याच्या सूचना
10. आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालये आणि जनरेटरची सुविधा करण्याचे निर्देश
11. मंत्रालयात 24 तास नियंत्रण कक्ष सुरु, लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना

‘निसर्ग’ चक्रीवादळाची थोडक्यात माहिती

– अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं चक्रीवादळ निर्माण झाले

– या चक्रीवादळाला बांगलादेशने ‘निसर्ग’ नाव सुचवले आहे.

– 3 जूनला उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात, रायगड, हरिहरेश्र्वर आणि दमण भागातून जाण्याचा इशारा

– रत्नागिरी, पालघरसह मुंबईवरही चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता

चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे टिप्स.

1. प्रथमोपचार पेटी तयार ठेवा, औषध गोळ्या असू द्या
2. पाणी उकळूनच प्या, थंड पाणी टाळा
3. सगळी इलेक्ट्रीक उपकरणं बंद करा, गॅसही बंद ठेवा
4. दारं, खिडक्या बंद ठेवा
5. घराचं काम पूर्ण करा, टोकदार गोष्टी बांधून ठेवा
6. तुमची महत्वाची कागदपत्रं वॉटरप्रुफ करून ठेवा
7. मोबाईल चार्ज करुन ठेवा, एसएमएसचा वापर करा
8. जर तुमचं घर असुरक्षित असेल तर सुरक्षित ठिकाण गाठा
9. मोडकळीस आलेल्या इमारती किंवा घरात जाऊ नका
10. विद्युत तार, खांब यापासून दूर राहा
11. समुद्रात किंवा किनारी जाऊ नका
12. जनावरं, प्राण्यांना बांधून न ठेवता मोकळं सोडा
13. माहितीसाठी न्यूज चॅनल, रेडिओ ऐकत राहा
14. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका
15. फक्त प्रशासनाच्या सूचना वेळेच्या वेळेला लक्षात असू द्या

निसर्ग चक्रीवादळ आणि मुंबई

1. शंभर वर्षात पहिल्यांदाच मुंबईच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकेल

2. निसर्ग चक्रीवादळाचा वेग ताशी 90 ते 125 किमीपर्यंत राहण्याचा अंदाज

3. निसर्ग चक्रीवादळ हे तीव्र स्वरुपाचं वादळ मानलं जातं आहे

4. समुद्र किनाऱ्यावर दोन मीटर उंचीपर्यंत लाटा उसळण्याचा अंदाज

5. मुंबई, ठाणे, रायगडच्या खोल भागात पाणी शिरण्याची भीती

6. महाराष्ट्रात पहिल्यांदा हरिहरेश्वरला धडकण्याचा अंदाज

7. मुंबईसह महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यात सर्वाधिक परिणाम होण्याची भीती

8. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये सर्वाधिक परिणाम होण्याचा इशारा

9. चक्रीवादळाला निसर्ग हे नाव बांगलादेशनं दिलं

10. मुंबईत सर्व समुद्रकिनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा
कोरोना आणि वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

Quick Deployment Antenna Vehicle -निसर्ग वादळाशी दोन हात करताना मोबाईल नेटवर्क गेल्यास quick deployment antenna चा वापर करण्यात येणार आहे. वादळाच्या पार्शवभूमीवर दूरसंचारचं नेटवर्क गेल्यास या वेहकलचा उपयोग होणार आहे

-सॅनिटायझर व्हॅन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना बोटीमध्ये बसवण्यापूर्वी बोट सॅनिटाईज केली जाणार आहे. यासाठी 500 लिटरच सॅनिटायजरची गाडी असणार आहे. लोकांना एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवण्याची वेळ आली तर ती जागा वापरापूर्वी सॅनिटाईज केली जाणार आहे.

-इक्विपमेंट व्हॅन – झाड पडल्यास, इमारत पडल्यावर किंवा विजेचे खांब पडल्यास ते कापण्यासाठी व्हॅनमध्ये कटर्स ठेवण्यात आली आहेत. स्लॅब एयर लिफ्टर (एखादी व्यक्ती स्लॅबमध्ये फसली असेल तर तिला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत होणार आहेत.

बोट – मुंबईसाठी एनडीआरएफकडे 9 बोट आहेत.
एका बोटमध्ये किमान 10 ते 12 जणांना बसता येईल एवढी क्षमता आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 4 ते 5 जणांना बसवले जाणार आहे. तसेच जवानांना घेऊन जाण्यासाठी बस तैनात आहे. यातही सोशल डिस्टंन्सिंग पाळलं जाणार आहे.

Share: