अडीच वर्ष शिवसेनेचा तर नंतरचे अडीच वर्ष राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार?

8
0
Share:

-शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा चालली. या चर्चेत सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्रिपद शिवसेना आणि राष्ट्रवादीत अडीच अडीच वर्ष आणि पूर्ण पाच वर्ष काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्यावर सर्वच पक्षांमध्ये एकमत झालं

 

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत आजचा दिवस महाराष्ट्राशी संबंधीत घडामोडींनी गाजला. सुरुवातीला शरद पवार पंतप्रधान मोदींना भेटले आणि नंतर बैठकांचा जो सिलसिला सुरू झाला तो रात्री उशीरापर्यंत चालला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चर्चा आणखी काही काळ सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आणखी काही दिवस ही चर्चा सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत असले तरी अनेक गोष्टींवर एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. यात पहिले अडीच वर्ष शिवसेनेचा तर नंतरचे अडीच वर्ष राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल असं ठरल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. शिवसेनाच्या मुख्यमंत्रिपदाला काँग्रेसचा आक्षेप नाही. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार येईल असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
शरद पवारांच्या घरची प्रदीर्घ बैठक झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली आणि त्यांना चर्चेची माहिती दिली. त्यानंतर हे नेते पुन्हा पवारांच्या भेटीला आले आणि त्यांनी सोनिया गांधींचा निरोप पवारांना दिला.

शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा चालली. या चर्चेत सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्रिपद शिवसेना आणि राष्ट्रवादीत अडीच अडीच वर्ष आणि पूर्ण पाच वर्ष काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्यावर सर्वच पक्षांमध्ये एकमत झालं असंही सांगितलं जातंय. त्यामुळे सत्तेचा मार्ग मोकळा झाला तरी पुढच्या चर्चेच्या फेऱ्यांवर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखेर काही अटींवरच शिवसेनेसोबत जाण्यास मान्यता दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.

काँग्रेस सत्तेत सहभागी होणार असला तरी काही अटींवर पुढे जा असा संदेत सोनियांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. दोन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येत असल्याने काँग्रेसालाही आपल्या प्रतिमेची काळजी आहे. त्यामुळे सरकार बनविण्याची घाई करू नका प्रत्येक गोष्ट शांतपणे विचारपूर्वक करा असे निर्देशही सोनियांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिले आहेत. पूर्ण 5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असण्यावर काँग्रेसला हरकत नाही. मात्र महत्त्वाची आणि जनहिताशी संबंधीत खाती काँग्रेसला हवी आहेत. त्याचबरोबर हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेकडून काँग्रेसला ठोस आश्वासन हवं आहे. असं आश्वासन मिळालं तरच काँग्रेस पुढे जाणार आहे.

अखेर जुळणार…या 6 मुद्यांवर एकत्र येणार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी!
ग्रामीण विकास, सार्वजनिक बांधकाम, वीज, पशुपालन यासारखी महत्त्वाची खाती काँग्रेसला हवी आहेत. या खात्याच्या माध्यमातूनच काँग्रेसला पुन्हा बळकटी देण्याचा प्रयत्न केला जावू शकतो असं त्यांना वाटतं. त्याचबरोबर संसदेत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मुद्यांना साथ द्यावी अशीही अपेक्षा काँग्रेसकडून व्यक्त केली जातेय.

Share: