मुंबई एपीएमसी मधील कांदा बटाटा मार्केट चार नंतर बंद,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

20
0
Share:
नवी मुंबई:कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी एपीएमसी बाजार समितीने कंबर कसली असुन ३१ मार्च पर्यत दर गृरुवार आणि रवीवार फळ आणि भाजीपाला मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतल्या नंतर आता ३१ मार्च पर्यत कांदा बटाटा मार्केट ची वेळ बदलून  बुधवार १८ मार्च पासून रोज दुपारी चार वाजता मार्केट बंद करणार असल्याचे बाजार समिती कडून सांगण्यात आले आहे.
देशात आणि राज्यात कोरोना विषाणू फैलावत चालला असुन रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. आणि।याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  आता एपीएमसी बाजार समिती देखील सज्ज झाली असून एपीएमसी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने खरेदीदाराला जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी फोनवर खरेदीदाराला माहिती देऊन  माल घरपोच  पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच फळ आणि भाजी मार्केट ३१ मार्च पर्यत दर गुरुवार आणी रविवारी साफसफाई तसेच निर्जंतुकीकरण करण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्या नंतर आता कांदा बटाटा मार्केट ची वेळ देखील बदलण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे  बुधवार  दि.१८ मार्च पासुन  सकळी साडेआठ ते दुपारी चार वाजेपर्यत मार्केट सुरू राहणार. चार नंतर संपूर्ण बाजार समितीची साफसफाई करण्यात व निर्जंतुकीकरण करण्यात  येणार असुन चार नंतर बाजार आवारातील सर्व वाहने बाहेर ठेवावी जेणेकरुन बाजार साफसफाई करताना कुठलीही अडचण येणार  नाही असे अवाहन बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण यांनी केले आहे.
Share: