कांद्याच्या भावाने शंभरी गाठली

22
0
Share:

कांद्याच्या भावाने शंभरी गाठली

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत या हंगामातील उन्हाळा कांद्याला 85 ते 70 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे कांद्याची आवक मोठया प्रमाणात घसरल्याने मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा अगदीं नगण्य स्वरूपात आहे त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याला चांगलाच दर मिळत आहे
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जुन्या कांद्याचे भाव100 ते 90 रुपये प्रति किलो तर नवीन कांद्याचे भाव 85 ते 70 रुपये प्रति किलो आहेत apmc मार्केट मध्ये जुना कांदा 100ते90 रुपये तर नवीन कांदा हा 85 ते 70 रुपये प्रति किलो भाव झाला आहे

कांद्याच्या दरात झालेली वाढ ग्राहकांना सहन करावी लागत असल्यामुळे किरकोळ बाजारात वाढीव भाव करून विकणाऱ्या व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी माहिती apmc मार्केट मधील व्यापारी मनोहर तोतलानी दिली आहे

अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाल्याने लाल कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे कांद्याचे बाजार भाव वाढले आहेत.
मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कांद्याची अवाक ही एका महिन्यात 100 टक्के झाली होती, मात्र या वर्षी 75 टक्के आवक घटली, असून या वर्षी कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे भाव शंभरी पर्यंत गेले आहेत .

कांद्याची बाजार भाव वाढ ही डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यत राहू शकते अशी माहिती कांदा क्षेत्रातील व्यापारी सुरेश शिंदे यांनी दिली आहे .

Share: