कांद्याच्या दरात किलो मागे ५ रुपयांची घट

7
0
Share:

नवी मुंबई :कांदा निर्यात बंदी ची घोषणा झाल्या पासून वेगवेगल्या बाजार पेठांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रया उमटू लागल्या आहेत. मुमबी कृषी उत्त्पन्न बाजार समिती मध्ये हा निर्णया नांतर कांद्याची मागणी कमी झाली आहे. आणि परिणामी दर किलो मागे पाच रुपयांनी कमी झाले आहेत त्यामुले आत्ता कांदा ३० ते ३५ रु किलो पर्यंत आला आहे.

गेल्या महिन्यात कांद्याचे दर वाढायला लागल्या पासून बाजारात कांद्याला मागणी हि वाढली होती. मात्र बाजारात कांद्याची आवक फक्त ६० ते ७० गाड्या इतकीच होत होती. पण कांद्याचे दर आणखीन वाढतील या भीतीने लोक कांद्याची खरेदी करून कांदा साठवून ठेवत होते. त्यामुळे बाजारात कांद्याला मागणी वाढत होती. आणि दर वाढत होते हे दर घाऊक बाजारात अगदी ५० रु किलो झाले होते तर किरकोळ बाजारात ७० ते ८० रु किलो पर्यंत पोहचले होते.
आधीच कांदयाचा साठा कमी असल्याने वाढत असलेली मागणी पूर्ण करणे शक्यच नव्हते. अखेर यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला आणि कांद्याची निर्यात बंदी उठवावी लागली . हि बंदी उठवल्यावर कांद्याच्या दरात लगेच फारसा फरक पडला नाही मात्र हळू हळू कांद्याची घाऊक बाजारातील मागणी कमी झाली. आणि त्यामुळे दर हि खाली यायला सुरुवात झाली. आता घाऊक बाजारात कांद्याच्या ५० ते ६० गाड्यांची आवक होत आहे मात्र कांद्याचे दर आता कमी कमी होत होत ३० ते ३५ रु किलो झाले आहेत. तर ३० ते ३५ रु झालेला ओला आणि लहान कांदा २५ ते ३० रु किलो पर्यंत आला आहे.
आत्ता अनेक लोकांनी कांदा खरेदी करून ठेवला आहे आणि त्यातच अनेकांचे नऊ दिवसांचे उपवास असल्याने कांद्याचा दररोज चा वापर हि कमी झाला आहे म्हणून कांद्याला घाऊक बाजारात मागणी कमी झाली आहे आणि दार हि खाली आलेलं आहेत अशी माहिती कांदा बटाटा अडत संघाचे सचिव सुरेश शिंदे यांनी दिली आहे.

Share: