मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात कांद्याचा भाव 30 रुपये किलोने घसरला

21
0
Share:

-गुजरात मधून नवीन कांद्याची आवक सुरू

-आज मार्केट मध्ये 110 गाड्याची आवक

नवी मुंबई:मुबंई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ असून या बाजार पेठेमध्ये मध्ये मागील आठवड्यात कांद्याच्या भावाने 100 री गाठली होती. मात्र या आठवड्यात नवीन कांद्याची आवक ही गुजरात मधून सुरू झाल्यामुळे आज कांद्याचे भाव हे घसरले असून 50 ते 70 रुपये किलो ने कांदा विकला जात आहे मात्र किरकोळ बाजारात कांद्याचा भाव हा 100 रुपये किलो नेच विकला जात आहे . येणाऱ्या पुढच्या काळात कांद्याचे भाव हे अजून घसरण्याची शक्यता आहे अशी माहिती घाऊक व्यापारी सुरेश शिंदे यांनी दिली आहे .घाऊक बाजारात कांद्याची आवक ही 110 गाड्या झाली आहे कांद्याच्या भावांमध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांना कांदा खरेदी करताना मोठा दिलासा मिळत आहे.

Share: