कांद्याचे भाव 150 वर जाण्याची शक्यता!

20
0
Share:

*कांद्याचे भाव 150 वर जाण्याची शक्यता*

नवी मुंबई:कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आयात करण्यात आली असून कांद्याचे 100 कंटेनर सद्या जेएनपीटी च्या बंदरात आले आहेत त्यातील इजिप्त थायलंड मधून आलेल्या कांद्याचे 5 कंटेनर  बाजारात आले आहेत थायलंड हुन 4 कंटेनर कांदा मुंबई घाऊक बाजारात आला आहे इजिप्त थायलंड कांद्याची किंमत प्रति किलो 90 ते 100 रुपये विकला जात आहे तर महाराष्ट्र गुजरात चा कांदा प्रति किलो 90 ते 125 रुपये विकला जात आहे परदेशातील कांदा आणि महाराष्ट्रातील कांद्याचे सरासरी कांद्याचा भाव एकच मात्र परदेशी कांद्याची चव महाराष्ट्रातील कांद्यासारखी नाही त्यामुळे परदेशी कांद्याला ग्राकांची मागणी कमी मिळत आहे
घाऊक बाजारात महाराष्ट्रातील कांद्याला 80 ते 125 रुपये किलोचा दर मिळाला असून हा दर 150 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे तसेच कांद्याच्या 115 गाड्यांची आवक झाली आहे मात्र तरी देखील कांद्याला हवा तसा उठाव मिळाला नसल्याचे व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले आहे

Share: