पुन्हा रडवणार कांदा!

20
0
Share:

नवी मुंबई : कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे अनेक भागातून वाढलेली कांद्याची आवक आणि मागणी घटल्याने एपीएमसी घाऊक बाजारात कांद्याचे भाव घटले होते.पावसामुळे या महिन्यात जास्त प्रमाणात कांद्याची मागणी नसते.पण आता मात्र अनलॉक 4 च्या नियमानुसार हॉटेल,रेस्टॉरंट, मॉल इ.सुरू झाल्याने आता कांद्याचा भाव 22 रुपये झाला असून,ग्राहकांना 30 ते 40 रुपये दराने मिळत आहे.

गेल्या वर्षीदेखील गणेशोत्सवानंतर कांद्याच्या दरात वाढ झाली होती.ग्राहकांना 100 ते 120 या दराने कांदा मिळत होता.यावर्षी पावसाळा सुरू असला कांद्याचे दर स्थिर असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत होता.पण काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढले आहे.आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे.2 महिन्यानंतर कांदा पन्नाशी गाठेल अशी माहिती कांदा बटाटा व्यपारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे

Share: