मुंबई Apmc कांदा बटाटा मार्केटमध्ये तुर्की व इराणच्या कांदा दाखल

20
0
Share:
नवी मुंबई :मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये १२० गाड्यांची आवक झाली असुन 4 गाड्या या तुर्की व इराणवरून आल्या आहेत. या कांद्याची  भाव 40 ते 50 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे,गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडले होते .काही दिवसांपूर्वी मार्केटमध्ये 90 रुपये प्रतिकिलोने विकला जाणाऱ्या कांदा आता 20 ते 60 रुपये विकला जात आहे तसेच ,ezypt, इराण,तुर्की, अफगाणिस्तान मधून आलेल्या कांद्याच्या भाव आणि आपल्या कांद्याच्या भाव एक सारख्या आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला उठाव नसल्याने कांद्या व बटाटयाच्या दरात घसरण झाली आहे. असे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र तुर्की व इराण वरून आलेला कांदा हा टिकाऊ असून चवीला उत्तम दर्जाचा असल्याने या कांद्याला बाजारात चांगला भाव असून उठाव देखील चांगल्या प्रकारचा आहे. तर नेमका कांद्याचा आजचा बाजार भाव काय आहे हे आपण जाणून घेऊया.
*जुना कांदा २० ते ६० रुपये किलो.
*नवीन कांदा २० ते ४० रुपये किलो.
*इराण व तुर्कीचा कांदा ४० ते ५० रुपये किलो
Share: