डिसेंबरपर्यंत कांदा सर्वसामान्यांना रडवणार!

6
0
Share:

नवी मुंबई:मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात कांद्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या महिन्यात घाऊक बाजारात कांद्याचा भाव हा प्रतिकिलो ३५-४० रुपयांवर होता मात्र आता तो ४५ते ५० रुपयांवर गेला असून किरकोळ बाजारात याच कांद्याची विक्री ही ६० ते ७० रुपये रुपयांवर होत आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसाने कांद्याचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जुना साठवणुकीचा कांदा खराब निघत आहे, त्यातच आवक कमी झाली असून किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन कांदा दाखविण्यास सुरुवात होते मात्र पावसामुळे यंदा नवीन कांदा हा बाजारात आलाच नाही. बाजारात नवीन कांदा दाखल होण्यास उशीर होणार असून येत्या डिसेंबपर्यंत कांदा हा भाव खाणार असल्याची माहिती महेश राऊत यांनी दिली आहे.

Share: