नवी मुंबई महापालिकेच्या 6 कोव्हीड सेंटर सुविधांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाइन लोकार्पण

4
0
Share:

नवी मुंबई: “चेस द व्हायरस” मोहिमेंतर्गत या पुढील काळात प्रत्येकाने अधिक काळजी घेत माझ्यामुळे माझे कुटुंब कोरोना बाधीत होता कामा नये याची काळजी घेऊन मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, नियमित हात धुणे, डोळे नाक व तोंडाला हात न लावणे, घरात आल्यानंतर लहानपणीच्या सवयीप्रमाणे हातपाय धुणे व कपडे बदलणे अशा साध्या साध्या पण महत्वाच्या गोष्टींची स्वयंशिस्त पाळली पाहिजे यादृष्टीने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम पुढील महिन्याभरात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. त्याचप्रमाणे राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आलेल्या आरोग्याच्या सोयीसुविधा उत्कृष्ट असून तेथील उपचारांबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित अत्याधुनिक आर.टी.-पी-सी-आर. चाचणी व निदान प्रयोगशाळा, 200 आयसीयू बेड्ससह 80 व्हेंटीलेटर्सची सुविधा, 3 ठिकाणी 1003 ऑक्सिजन बेड्सची सुविधा असणारी डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर्स तसेच ऐरोली येथील 302 बेड़्सचे कोव्हीड केअर सेंटर अशा 6 सुविधांच्या ऑनलाईन लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सूचनेनुसार राज्य सरकारने 80 टक्के ऑक्सिजन रुग्णालयांकरीता व 20 टक्के ऑक्सिजन उद्योगांसाठी देण्याचा निर्णय घेतला असून त्याचे वितरण केंद्रीय पध्दतीने होणार असल्याचे सांगितले. आवश्यकतेनुसार बेड्स तसेच प्रयोगशाळाही वाढविण्यात आल्या असून उपचार सुविधा वाढविताना त्यांचा उपयोग ज्यांना आवश्यकता आहे अशाच रुग्णांकरिता होईल याकडेही बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्रीयांनी यावेळी केल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेने चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. हा समाधान देणारा कार्यक्रम असून ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देताना अगदी शौचालयातही ऑक्सिजन उपलब्धतेची काळजी घेत असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. त्याचप्रमाणे कोरोना बाधिताच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यासाठी व्हिडीओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दलही मुख्यमंत्रीना कौतुक केले.
याप्रसंगी बोलताना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका कोव्हीड उपाययोजनांबाबत चांगले काम करीत असल्याचे नमूद केले. 15 लाख लोकसंख्येमध्ये 1.5 लाखाहून अधिक टेस्टिंग केल्याचे नमूद करीत 25 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व हे प्रमाण 86 टक्के इतके चांगले आहे असे ते म्हणाले. मृत्यू दरातही घट झाली असून तो 2.19 इतका आहे. हे चांगले संकेत असले तरी कोणत्याही प्रकारे गाफील न रहाता रुग्ण शोध वाढवून अधिक दक्षतेने काम केले जाईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी ‘मिशन ब्रेक दे चेन’ अंतर्गत टेस्ट, आयसोलेट, ट्रिट या त्रिसूत्रीच्या आधारे करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. मुख्यमंत्रीनी केलेल्या सूचनांनुसार ‘मिशन झिरो’ साठी यापुढील काळात अधिक प्रभावीपणे काम केले जाईल व 3.3 वरून 2.19 पर्यंत खाली आलेला मृत्यू दर आणखी कमी करीत शून्यावर आणण्याकरिता कसोशीने प्रयत्न केले जातील असे सांगितले.

कोव्हीड 19 वैद्यकीय सुविधा

Ü कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी “मिशन ब्रेक द चेन” हाती घेऊन “टेस्ट, आयसोलेट, ट्रिट” या

त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी.

Ü जलद रुग्णशोधासाठी चाचण्यांच्या संख्यावाढीवर भर.

Ü 22 टेस्टिंग केंद्रे तसेच सोसायट्यांमध्ये जाऊन 34 मोबाईल व्हॅनव्दारे अँटिजन टेस्टींगवर भर.

Ü शहराच्या 15 लाख लोकसंख्येमधून 1 लक्ष 50 हजार 175 व्यक्तींचे कोव्हीड 19 टेस्टींग पूर्ण.

Ü मृत्यूदरात लक्षणीय घट (मागील 1 महिन्यातील मृत्यूदर 1.56)

(एकूण मृत्यूदर 3.54 वरून 2.19 )

* अत्याधुनिक आर.टी. – पी.सी.आर. चाचणी व निदान प्रयोगशाळा *

Ü नेरुळ येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात स्वत:ची

अद्ययावत अशी संपूर्ण स्वयंचलित आर.टी.पी.सी.आर. चाचणी व निदान प्रयोगशाळा.

Ü केवळ 11 दिवसात आय.सी.एम.आर. शासकीय परवानगीसह कार्यान्वित.

Ü प्रतिदिन 1000 चाचण्यांची क्षमता.

Ü आर.एन.ए. एक्स्ट्रॅक्शन तसेच आर.टी.-पी.सी.आर. मशीन स्वयंचलित असल्याने रिपोर्ट जलद प्राप्त.

Ü प्रयोगशाळेत प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट उपलब्ध करून देण्यात आल्याने कर्मचा-यांना संसर्ग होण्याचा

धोका टाळला जातो.

Ü नवी मुंबईकर नागरिकांसाठी मोफत चाचणी सुविधा उपलब्ध.

Ü यापूर्वी प्रति चाचणी 2200 रूपये इतका खर्च महानगरपालिकेस येत होता. स्वत:ची प्रयोगशाळा सुरू

झाल्याने तो खर्च 700 रूपये प्रति चाचणी इतका कमी येतो.

Ü मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील महानगरपालिकांमध्ये अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अद्ययावत

प्रयोगशाळा.

Ü कोव्हीड 19 नंतरच्या आगामी काळात स्वाईन फ्ल्यू, लेप्टोस्पायरिसीस, एच.आय.व्ही. ते अगदी

कर्करोगापर्यंतच्या मॉल्युक्युलर टेस्टींग या प्रयोगशाळेत होणार असल्याने महानगरपालिकेच्या

आरोग्य विभागाचे सक्षमीकरण करणारी सुविधा.

* डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल (DCH) *

* 200 आय.सी.यू. बेड्स सह 80 व्हेंटिलेटर्स सुविधा *

Ü सद्यस्थितीत कोव्हीड 19 उपचारार्थ 335 आय.सी.यू. बेड्स, 131 व्हेंटिलेटर्स सुविधा,

2266 ऑक्सिजन बेड्स तसेच 3308 सर्वसाधारण बेड्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

Ü www.nmmchealthfacilities.com या ‘रिअल टाईम अपडेटेड डॅशबोर्ड’ व्दारे नागरिकांना

बेड्स उपलब्धतेबाबतची माहिती सहजपणे एका क्लिकवर उपलब्ध.

Ü गंभीर लक्षणे असणा-या रुग्णांना आय.सी.यू. बेड्स व व्हेंटिलेटर्सची कमतरता भासू नये याकरिता

नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयासोबत 200 आय.सी.यू. बेड्ससह 80 व्हेंटिलेटर्स

नवी मुंबई महानगरपालिकेकरिता उपलब्ध करून देण्याबाबत करार.

Ü त्यास अनुसरून 100 आय.सी.यू. बेड्स व 40 व्हेंटिलेटर्स उपलब्ध.

Ü 20 सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने उर्वरित आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार.

Ü क्रोनिक किडनी डिसीज् असणा-या कोरोनाबाधित व्यक्तींकरिता डायलेसिस सुविधा.

Ü नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिकेमार्फत ही सुविधा मोफत उपलब्ध.

* डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (DCHC) – 1003 बेड्स *

Ü ऑक्सिजन बेड्स सुविधेत वाढ करण्यासाठी 3 ठिकाणी “डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर्स” उभारणी.

Ü याव्दारे नवीन 1003 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

Ü (1) राधास्वामी सत्संग आश्रम, सेक्टर 24, तुर्भे.

35 हजार चौ.फूट क्षेत्रफळात 411 ऑक्सिजन बे़ड्सची क्षमता.

Ü (2) निर्यात भवन, ए.पी.एम.सी. मार्केट, सेक्टर 19, तुर्भे.

3 मजली इमारतीत 517 ऑक्सिजन बे़ड्सची क्षमता.

Ü (3) एम.जी.एम. रूग्णालय, सेक्टर 30 ए, सानपाडा – वाशी

75 ऑक्सिजन बे़ड्सची क्षमता.

Ü तिन्ही ठिकाणी, ऑक्सिजन आवश्यक असणा-या रूग्णांच्या प्रकृतीत अधिक बिघाड होऊ नये म्हणून

शौचालयातही ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था.

Ü एक्स – रे व रक्त तपासणीसह इतर पॅथोलॉजिकल चाचण्यांची सुविधा.

Ü महिलांकरिता सर्व ठिकाणी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था व सुरक्षेच्या दृष्टीने सी.सी.टि.व्ही. यंत्रणा.

Ü मेंटली चॅलेंज्ड व स्पेशल नीड रूग्णांसाठी विशेष कक्ष कार्यान्वित.

Ü रूग्णांच्या विरंगुळ्यासाठी एल.ई.डी. टीव्ही आणि वाय-फाय सुविधा.

Ü रूग्णांना नातेवाईकांशी संवाद साधता यावा यादृष्टीने व्हिडिओ कॉलची विशेष सुविधा.

Ü रुग्णांच्या आरोग्यपूर्ण आहाराची विशेष काळजी घेत उच्च प्रतीचे जेवण, फळे व दूध पुरवठा.

* कोव्हीड केअर सेंटर (CCC) – 302 बेड्स *

Ü पाटीदार समाज भवन, सेक्टर 15, ऐरोली.

302 बेड्स क्षमता असणारे कोव्हीड केअर सेंटर निर्मिती.

Share: