माथाडी कामगारांचे आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन आदरांजली

19
0
Share:

नवी मुंबई: महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांची 87वी जयंती शुक्रवारी,25 सप्टेंबर रोजी, सकाळी ११.०० वाजता कै. शिवाजीराव पाटील सभागृह, माथाडी भवन नवी मुंबई येथे ऑनलाईनव्दारे आदरांजली वाहण्यात येणार आहे.दरवर्षी मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात साजरी केली जाते. परंतु, कोरोना विषाणूच्या या महाभयंकर संसर्गजन्य रोगाला रोखण्यासाठी राज्य सरकार व नवी मुंबई महानगरपालिकेने मेळाव्यास प्रतिबंध कायम ठेवल्याने जयंतीनिमित्त मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सींग व इतर नियमांचे पालन करण्यात आला आहे.या कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस ,पणन मंत्री बाळासाहेब पाटील,ऐरोली आमदार गणेश नाईक ,शिवसेना नेते विजय चौगले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र पाटील यांनी दिली.

 

Share: