हळद प्रक्रिया उद्योगातील संधी

Share:

भारत हा हळद पिकवणारा एक प्रमुख देश आहे. हळद हे एक मसाल्याच्या पिकातील प्रमुख नगदी पिक म्हणून प्रचलित आहे. प्रतिवर्षी २५ लाख प्रती टन मसाले पिकाचे उत्पादन होते. भारतातील अनेक राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही मासालेवर्गीय पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी ७६% हलद भारतात होते. महाराष्ट्रात अंदाजे १, १२, ४७२ हेक्टर क्षेत्रावर मसाले पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्हात हळदीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झालेली आहे.

१) हळद काढणी: हळद काढण्याच्या अगोदर खालील माहिती असणे आवश्यक आहे. बेने लावल्यापासून ८ ते ९ महिन्यांनी पिक काढणीस तयार होते. पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात. काढणी साधारण फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत चालते. पिकाची काढणी करण्यापूर्वी १५ दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. जमीन थोड ओलसर असल्यास कंद काढणे सोपे जाते. कंद काढण्यापूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापुन घ्यावी. कुदळीने कंद काढून त्यातील जेथे गड्डे वेगळे करावे. कान्दावरील मुले कापावे व माती स्वच्छ पाण्याने धुवून काढावी. काढणीच्या वेळी गड्ड्याना खरचटणे व जखम होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक झाडापासून सरासरी १० ते २० कान्याकंद मिळतात.

२) हळदीचे उत्पादन: हळदीच्या कंदाचे उत्पादन प्रती हेक्टरी ३०० ते ४०० क्विंटल मिळते.३५ ते ४० क्विंटल मातृकांदाचे उत्पादन मिळते.महाराष्ट्रात तसेच माराठवाड्यात सर्वात ज्यास्त सेलम या वाणाचा उपयोग केला जातो. तसेच मागील २ ते ३ वर्षात प्रभा, प्रतिभा व कृष्णा या वाणाचा वापर वाढला आहे.

Share: