राष्ट्रवादीकडून इतर पक्षांनी शिकलं पाहिजे, पंतप्रधान मोदीं

4
0
Share:

राष्ट्रवादीकडून इतर पक्षांनी शिकलं पाहिजे, पंतप्रधान मोदीं.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार 18 नोव्हेंबरपासून सुरू झाले. यंदाचे हिवाळी अधिवेशन विशेष आहे, कारण राज्यसभेचे हे 250 वे सत्र आहे. 250 व्या सत्रानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेला संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी शरद पवार अध्यक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) आणि नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दल (बीजेडी) या पक्षांचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आज मला एनसीपी आणि बीजेडीने विशेष कौतुक वाटते. या दोन्ही पक्षांनी संसदेच्या तत्त्वांचे कठोरपणे पालन केले आहे. एनसीपी आणि बीजेडीने संसद सत्रादरम्यान आपले खासदार सभापतींसमोरील वेलमध्ये विरोध प्रदर्शनासाठी उतरणार नाहीत हे ठरवले आणि त्याचे पालनही केले. आपल्याला संसद सत्रामध्ये गोंधळ घालण्याऐवजी ते योग्यरित्या सुरू ठेवणे आवश्यक आहे’, असेही मोदी पुढे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणावेळी राज्यसभेभा ही एक विचारधारा असल्याचे म्हटले. राज्यसभेचे 250 वे सत्र म्हणजे एक विचारधारा आहे. आतापर्यंतचा राज्यसभेचा प्रवास प्रेरणादायी असाच होता. अनेक कर्तृत्ववान नेत्यांनी आतापर्यंत राज्यसभेचे नेतृत्व केले आहे. यात खेळापासून ते सिनेसृष्टीपर्यंतच्या लोकांच्या समावेश आहे. राज्यसभेने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले. राज्यसभा त्या क्षणांची आणि त्यातील बदलांचीही साक्षिदार झाली, असेही मोदी यावेळी म्हणाले.

Share: