Palghar: कृषी कार्यालयातील योजनांमध्ये गैरव्यवहार केल्याचा जिप उपाध्यक्षांचा आरोप!

20
0
Share:

 

पालघर :पालघर हा जिल्हा आंधळ्यांचा मुक्याचा आहे, अशी भावना घेऊन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या योजना कृषी अधिकारी गिळंकृत करून शासकीय निधीचा मोठा अपहार झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी केला आहे.

कृषी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तालुक्यामध्ये कोट्यावधीच्या योजना राबवल्या जातात मात्र या योजना कागदावरच राबवल्या जाऊन शासकीय निधीचा थेट अपहार कृषी अधिकाऱ्यांकडून सुरू असून हा अपहार उघड होऊ नये यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून योजना संबंधातील माहिती लपवण्याचा प्रयत्न कृषी विभाग करीत असल्याच्या गंभीर आरोप ही सांबरे यांनी केला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यांच्याकडे गेल्या आठ महिन्यांपासून विविध योजना राबवल्या बाबतची माहिती व त्याच्यावर खर्च केल्याची माहिती मागवण्यात आली होती मात्र ती देण्यात आलेले नाही कृषी विभाग ही माहिती देत नसल्याने कृषी सचिवांकडे ही तशी तक्रार केली आहे मात्र त्यानंतरही योजनांची यादी हे प्रशासन देऊ शकले नसल्यामुळे आता याची तक्रार थेट मुख्यमंत्री व राज्यपालांकडे करण्यात आली आहे ही माहिती न मिळाल्यास पंधरा दिवसात उच्च न्यायालयात या विरोधात दाद मागणार असल्याचे सांबरे यांनी सांगितले .पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यापासून ते आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकरीवर्गासाठी कृषी विभागांतंर्गत विविध योजना राबविल्या गेल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.या योजना राबविल्या गेल्या असतील तर त्यांचे सबलीकरण होणे आवश्यक होते.मात्र तसे झालेले नाही.याउलट शेतकरी वर्ग आजही उपेक्षितच आहे.याबाबतचा पत्रव्यवहार व विविध योजनांवर झालेल्या खर्चाची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी कृषी कार्यालयाकडे मागितली होती. अनेक पत्रव्यवहार केल्यानंतरही जिल्हा कृषी खाते माहिती देत नव्हते.योजनांमध्ये अधिकारी वर्गाने आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे ते माहिती देत नसल्याचा गंभीर आरोप करीत अधिकारी वर्गाची विभागीय चौकशी व त्यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी ही केली आहे.राज्यपाल यांच्याकडे तक्रार योजनांबाबत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय,कृषी सचिव कार्यालय यांच्याकडे वारंवार विविध योजनांवरील झालेल्या खर्चाची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही ही माहिती प्राप्त न झाल्याने यासंबंधात शेतकरी वर्गाच्या तक्रारीनुसार माहिती दिली जात नसून कृषी कार्यालयातील अधिकारी अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसले आहेत.माहिती दिल्यास भ्रष्टाचार उघडकीस येईल या भीतीमुळे माहिती लपविण्याचा प्रयत्न करीत असून कृषी विभागात तीन वर्षांहून अधिक काळ सेवा झालेल्या अधिकारीची चौकशी केल्यास भ्रष्ट्राचार उघडकीस येईल त्यामुळे चौकशी करावी असे पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे दिले गेले आहे.जिल्हा कृषी कार्यालय राज्याच्या योजनांची अंमलबजावणी करीत असते.थेट लाभार्थी हस्तांतरण प्रक्रिया असल्याने कोणताही गैरव्यवहार झालेला नाही.योजना राबविण्याबाबतची सर्व माहिती तालुकास्तरावर उपलब्ध आहे.तालुक्याला माहिती देण्याबाबत अवगत केले आहे असल्याचे के.बी.तरकसे,जिल्हा कृषी अधीक्षक यांनी प्रतिक्रिया दिली

 

Share: