पालघरच्या एटीएस पथकाची कारवाई,तरुणाचा दोन वर्षापूर्वी खून करून शौचालयात गाडलेला  मृतदेह सापडला

14
0
Share:

वाडा : आसाम राज्यातील तरुणाचा दोन वर्षापूर्वी खून करून शौचालयात गाडलेला  मृतदेह सापडला अमिनूल हक मोहम्मद मुनताज अली  अतिरेकी संघटनांच्या जाळ्यात तर अडकला नाही ना? म्हणून एटीएसच्या वेगवेगळ्या विंग गेली दहा महिने देशभर तपास करत होत्या.

वाड्यातील एका फार्म हाऊसमध्ये आसाम राज्यातील ( मूळ गाव- राजाअली जिल्हा -नागाव  राज्य -आसाम ) काम करणारा अमिनूल हक मोहम्मद मुनताज अली  हा १७ वर्षीय तरुण  हरवल्याची तक्रार वाडा पोलिस ठाण्यात तीन वर्षापूर्वी दाखल झाली होती मात्र हा तरुण हरवला नसून चुलत भावानेच त्याचा खून केल्याचे उघड करण्यात पालघर एटीएसला यश आलेय.खून करून मृतदेह फार्म हाऊसमधील शौचालयात गाडून आरोपी त्याच फार्म हाऊसमध्ये कित्येक महिने काम करून ‘तो मी नव्हेच’ अशा अविर्भावात वावरणाऱ्या आरोपीला अखेर एटीएसने गजाआड केला.

Share: