PM Modi Live : संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन, मोदींची मोठी घोषणा

5
0
Share:

संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन, मोदींची मोठी घोषणा

नई दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा देशाला (PM Narendra Modi speech lockdown) संबोधित केलं. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांनी लॉकडाऊनमध्ये पाळलेल्या संयमाबद्दल देशवासियांचे आभार मानले. तसंच मोदींनी देशातील कोरोनाची स्थिती पाहता देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली.

नमस्ते माझ्या प्रिय देशवासियांनो

कोरोना जागतिक महामारीच्या विरोधात भारताची लढाई फार मजबुतीने पुढे जात आहे. तुमच्या सर्व देशातील नागरिकांची तपस्या आणि तुमच्या त्यागामुळे भारताचं कोरोनामुळे फार कमी नुकसान झाले आहे.

तुम्ही सर्वांना अनेक त्रासाचा सामना करुन देशाला वाचवलं आहे. आपल्या भारताला वाचवलं आहे.

मला माहिती आहे तुम्हाला फार अडचणींचा सामना करावा लागला आहे. काहींना खाण्याचे कोणला येण्या-जाण्याची, काही जण त्यांच्या कुटुंबापासून दूर आहे. पण तुम्ही देशासाठी एक लढवय्या सैनिकाप्रमाणे तुमचं कर्तव्य करत आहे. त्याबद्दल मी तुम्हाला हात जोडून नमस्कार करतो.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

अनेक कष्ट सोसून तुम्ही संकटाशी दोन हात करत आहेत, तुम्हाला सलाम, तुमच्या त्यागामुळेच भारत कोरोनाशी लढत आहे, एखाद्या सैनिकाप्रमाणे कर्तव्य निभावत आहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला नागरिकांनी संयम दाखवत खरी श्रद्धांजली दिली – पंतप्रधान नरेंद्र मोदी लाइव्ह

अन्य देशांच्या तुलनेत भारताने कसा कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला, याचे तुम्ही सहभागी आणि साक्षीदार आहात – पंतप्रधान नरेंद्र मोदी लाइव्ह

भारतात कोरोना केस सापडण्याआधीच आपण परदेश सीमा बंद केल्या, समस्या वाढण्याची वेळ पहिली नाही, समस्या दिसताच ती थांबवण्याचा निर्णय घेतला

इतर देशांशी तुलना करण्याची वेळ नाही, पण आपली स्थिती जगातील महासत्तांच्या तुलनेत आटोक्यात आहे

भारताने वेगवान निर्णय घेतले नसते, तर काय स्थिती असती, याची कल्पना करूनही अंगावर शहारे येतात, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा मोठा लाभ, याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली, पण जीवापुढे याचं मोल नाही

पंतप्रधान मोदींचे 26 दिवसातील चौथे संबोधन

– 19 मार्च – 29 मिनिटांचे भाषण, 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन, टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन
– 24 मार्च – 29 मिनिटांचे भाषण, 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा
– 3 एप्रिल – 12 मिनिटांचा व्हिडीओ संदेश, 5 एप्रिलला 9 वाजता 9 मिनिटे दीपत्कार करण्याचं आवाहन
-14 एप्रिल – आज संबोधन

Share: