तरुणावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपीला लवकर अटक करणार ,पोलीस उपायुक्त पंकज दहाने

7
0
Share:
नवी मुंबई:
वाशीतील सागर विहार परिसरातून तरुणाचे अपहरण करून गँगरेप केल्याची घटना उघडकीस आली आहे. लैंगिक अत्याचारानंतर सुमारे अर्धा तास मारहाण करत होते. वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.
वाशी येथील सागर विहार परिसरात हा प्रकार घडला आहे. तुर्भे परिसरात राहणारा 34 वर्षीय तरुण त्या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी आला होता. यावेळी त्या ठिकाणी पाच तरुण आले. ते सर्वजण पूर्णपणो नशेमध्ये होते.त्यांनी सदर तरुणावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला ,आरोपी तरुण तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित पुरुषाच्या पार्श्वभागात नारळाची अर्धवट करवंटी व कंडोम टाकून त्याचा छळ करून पलायन केले.
या प्रकारामुळे गंभीर जखमी झालेल्या पीडित पुरुषावर कोपरखैरणे येथील खासगी रुग्णालयात तातडीने शस्रक्रिया करण्यात आली असून अद्याप त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, वाशी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा कसून शोध सुरू केला आहे.या प्रकरणात पोलीस उपायुक्त पंकज दाहणे सांगितले की  आम्ही विशेष पथक तयार करून तपास सुरू केला आहे  लवकरात आरोपीला गजाआड करणार.
या घटनेतील पीडित पुरुष तुर्भे परिसरात राहणारा असून सोमवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे वाशीतील जागृतेश्वर तलाव घाट क्रं.२ येथे गेला होता. यावेळी तो मोबाइलवर बोलत असताना त्याठिकाणी आलेल्या 20 ते 25 वयोगटातील पाच तरुणांनी त्याला जबरदस्तीने उचलून टाटा कॉलनी व जागृतेश्वर तलाव घाटालगत असलेल्या झड्यात नेऊन त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी त्याच्या पार्श्वभागात नारळाची अर्धवट करवंटी, कंडोम व इतर वस्तू टाकून तेथून पलायन केले.या घटनेनंतर पीडित पुरुषाने जखमी अवस्थेत घर गाठले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला कोपरखैरणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तातडीने शस्रक्रिया करण्यात आली असून, अद्याप त्याची प्रकृती चिंताजनक आहे.सूत्राने सांगितले प्रमाणे काही महिन्यांपूर्वी पीडित पुरूष सोबत बाचाबाची झाल्या होता आणि त्यांनी धमकी दिले होते पोलीस त्याच प्रमाणे चौकशी सुरू केला आहे ।
Share: