एका बाजूला राजकारणाच्या घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला अमित ठाकरेंचा थाळी नाद महामोर्चा

6
0
Share:

एका बाजूला राजकारणाच्या घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला अमित ठाकरेंचा थाळी नाद महामोर्चा

*
शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील सोहळ्यात शपथ घेणार आहेत ,तर दुसरीकडे राज साहेबांचे चिरंजीव अमित ठाकरे आज कार्यकर्त्यांसोबत  थाळी नाद महामोर्चात सहभागी झाले.

20 वर्षा नंतर  पहिल्यांदा शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळत आहे . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना , काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथ विधी आज शिवाजी पार्क येथे सायंकाळी पार पडणार आहे  एका बाजूला राजकारणाच्या या घडामोडी घडत असताना .दुसऱ्या बाजूला ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ  नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर थाळी नाद महामोर्चा काढण्यात आला या महामोर्चाचे नेतृत्व स्वतः अमित ठाकरे यांनी  केले . कामगारांचे 14 महिन्याचे पैसे महानगरपालिकेकडे थकीत आहेत ते पैसे कामगारांना मिळून देण्यासाठी ,तसेच प्रशासनाला जाग करण्यासाठी अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली थाळी नाद महामोर्चा काढण्यात आला . यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारले  आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तर त्या शपथ विधीला राज साहेब जाणार का ?असे विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की याबद्दल मला काहीही माहिती नाही ,घरी  जाऊन ह्या बद्दल माहिती मिळेल .
कंत्राटी कामगारांच्या न्यायहक्कांसाठी महामोर्चा सीवूड स्टेशन ते नवी मुंबई महानगर पालिके पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा कार्यकर्ते अमित ठाकरे, हे पहिल्यांदाच रस्त्यावर उतरले आहेत  नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे व मोठया प्रमाणात कंत्राटी कामगार सहभागी झाले होते  राज ठाकरेंचे चिरंजीव पहिल्यांदाच रस्त्यावर उतरले असून
मा.अमितसाहेबांच्या नेतृत्वाखालील  या आंदोलनाला यश. आले आहे अमित साहेबांनी तीन आठवड्यात कामगारांचे ९० कोटी मिळणार.असे .आयुक्तांचे लेखी आश्वासन घेतले आणि मगच ते महापालिकेतून बाहेर आले आहे.अमित ठाकरे यांच्या मोर्चातील प्रत्यक्ष सहभागातून होकारत्मक चित्र दिसून आले आहे.

Share: