मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाल्याची विक्रमी आवक, 42 हजार 495 क्यूइंटल भाजीपाला व  7 लाख 81 हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश.

Share:

नवी मुंबई- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये सोमवारी 740 वाहनांची आवक झाली. यामध्ये 42 हजार 495 क्यूइंटल भाजीपाला व 7 लाख 81 हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. भाजीपाला मार्केटमध्ये तब्बल 740 वाहनांची आवक झाली. पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा व इतर राज्यातूनही भाजीपाला विक्रीसाठी आला. मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत मार्केटमधून मुंबईत भाजीपाला विक्रीसाठी जात असल्याचे चित्र मार्केटमध्ये पाहावयास मिळत होते.

काही दिवसांपासून वाटाणा 14 रुपये किलो विकला जकात होता आज 25 रुपये प्रति किलोने विक्री झाल्याने थोडाफार व्यपाऱ्याना दिलासा मिळाले आहे .आवक जास्त असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात होते मालाची उठाव पण होता मात्र वाटाणा , फरशवी ,शेंगा सोडून इतर भाज्यांची दरात घसरण होते . कोबी 3,फ्लावर 5,फरसबी 18,कारला 24,बांगी 24,काकडी 12,गाजर 12,शेंगा 60 ते 80,शिमला 24,रुपये दराने विकला जात आहे .
मात्र बाजार आवारात ग्राहक कमी प्रमाणात पाहायला मिळाले आहेत.

 

 

Share: