फायदेशीर पेरू लागवड तंत्रज्ञान

63
0
Share:

पेरू पिकाचे वैशिष्ट्ये म्हणजे या पिकाचा कणखरपणा म्हणजेच कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक. पेरूचे फळे रूचकर आणि इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्यामूळे पेरूचे फळ सर्व लोकांमध्ये प्रिय आहे. पेरूच्या फळामध्ये ‘क’ जीवनसत्व तसेच खनिजद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. पेरूच्या फळापासून जॅम, जेली, आईस्क्रीम, सरबत तसेच हवाबंद डब्यातील फोडी तयार करता येतात. पेरूचे झाड टणक असल्यामूळे शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी झाडाचा उपयोग होतो. इतर फळझाडांच्या तुलनेत पेरूचे पिक कमी खर्चाचे हमखास उत्पादन देणारे आणि कमी मेहनतीचे असल्याने ह्या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.

हवामान आणि जमीन:

उष्ण आणि समशितोष्ण हवामानात जेथे हिवाळ्यात थंडी अधिक असते तेथे पेरूची लागवड करता येते. कोरड्या आणि उष्ण हवामानात पेरूचे उत्पादन चांगले येते. पेरूच्या झाडाची ताण सहन करण्याची क्षमता जास्त असल्याकारणाने दुष्काळी भागात सुध्दा पेरूची यशस्वी लागवड करता येते.

लागवडीसाठी जमीनीची निवड करताना जमीन पाण्याचा योग्य निचरा होणारी तसेच हलकी व मध्यम काळी व ज्या जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 आहे अशी जमीन लागवडीस योग्य आहे.

सुधारित जाती:

पेरूच्या अनेक सुधारती जाती उपलब्ध आहेत. यापैकी व्यापारीदृष्ट्या सरदार (लखनऊ-49) व ललित या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये सरदार (लखनऊ-49) ही जात अधिक उत्पादन आणि चांगल्या प्रतीची फळे देणारी आहे.

पेरूची अभिवृध्दी:

पेरूची अभिवृध्दी दाब कलम पध्दतीने करतात. पेरूच्या लागवडीसाठी जोमदार वाढीची आणि निरोगी कलमे निवडावीत. कलमाच्या लागवडीसाठी 3 X 3 X 3 फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डा भरताना यामध्ये जैविक खताचे मिश्रण तयार करून टाकावे.

शेणखत/गांडूळखत: 15 किलो प्रती खड्डा

अझोटोबॅक्टर: 50 ग्रॅम प्रती खड्डा

पी.एस.बी: 50 ग्रॅम प्रती खड्डा

के.एम.बी: 50 ग्रॅम प्रती खड्डा

ट्रायकोडर्मा: 50 ग्रॅम प्रती खड्डा

निंबोळी पेंड: 50 ग्रॅम प्रती खड्डा

फॉलीडॉल पावडर: 100 ग्रॅम

Share: