कोरोना काळात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; ७३७ बुथवर ५७ हजारांहून अधिक बालकांना लसीकरण 

16
0
Share:
नवी मुंबई: केंद्र व राज्य शासनाच्या तसेच नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार आज नवी मुंबईत आज उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली. यामध्ये महानगरपालिकेच्या एकूण २३ नागरी आरोग्य केंद्रांकडून खासगी वैद्यकीय व्यवसायांचे दवाखाने रुग्णालये, सोसायटींची कार्यालये या ठिकाणी ६०८ स्थायी बूथ. रेल्वे स्टेशन, टोल नाके, डेपो १०१ अस्थायी बूथ तर उड्डाणपुलाखाली, दगडखाणी, रेल्वेलगतच्या झोपडपट्यांमध्ये असलेले २८ मोबाईल बूथ अशाप्रकारे विविध ठिकाणी एकूण ७३७ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते.
तब्ब्ल ५ वर्षाखाली असलेल्या एकूण ७८ हजार बालकांना नजरेसमोर ठेवून या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संपूर्ण दिवसभरात ५ वर्षाखालील एकूण ५७ हजार ७७६ बालकांनी या पल्स पोलिओचा लाभ घेतला. ज्या बालकांना काही कारणास्तव लसीकरण झाले नाही त्यांच्यासाठी विशेष लसीकरण घेण्यात येणार असून २ नोव्हेंबर ते ६ २०२० या कालावधीत घरोघरी जाऊन या मोहिमेचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या मोहोमेसाठी ७५३ पथके तयार करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या काळात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले तसेच लहान मुलांना केले जात असल्याने पोलिओ बूथवर कोरोनासंबंधित सर्व खबरदारी घेण्यात आली होती. तसेच सर्व बुथवर सुरक्षित अंतर राखण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली असून मास्कचा वापरही बंधनकारक करण्यात आला होता. तसेच लहान मुलांना लस देण्याआधी व दिल्यानंतर हात सॅनिटाईज करण्यात येत होते. लस देता वेळी मुलांना पालकांकडेच ठेवण्यात येत होते. व लांबूनच बाळाला ड्रॉप देण्यात येत होते. तसेच कोणत्याही प्रकारचा स्पर्श बाळाला न करता त्याच्या पालकांनाच त्याचे बोट धरण्यास सांगून फिंगर मार्किंगची प्रक्रिया करण्यात येत होते. आपला देश, आपले राज्य व आपले शहर हे पोलिओमुक्त राहावे याकरिता या प्लस पोलिओ मोहोमेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या मोहोमेला नवी मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
Share: