बर्ड फ्ल्यूच्या भीतीने अंडी आणि चिकनला नकार; खवय्यांचा मटण आणि माशांवर ताव!

8
0
Share:

मुंबई : बर्ड फ्ल्युमुळे मुंबईत भीतीचा वातावरण झालं आहे त्यामुळेच आता मुंबईकतील नाॅनव्हेज खाणारे आता मोर्चा चिकन सोडून मटणाकडे वळवलेत
त्यामुळेच आता दुकानदार हवालदिल झालेयत. चिकनचे दर हे २२० रुपयांवरून घसरून १६० वर आलेयत, तर मटणाचे दर हे प्रती किलो ६४० च्या घरात पोहोचलेयत.
मागणी वाढली की हे दर वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते. दुकानदार ग्राहक हे वारंवार चिकन सोडून मटणाची किंवा माशांची मागणी करत असल्याची तक्रार करत आहेत.
बर्ड फ्लूच्या भीतीपोटी ग्राहक काही दिवस चिकनपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकंच नाही तर अंड्यांची विक्रीही कमी झाली आहे. मुंबईत अंड्यांचे दर 6 रुपयांवरुन 5 रुपयांवर घसरले आहेत. तर, येत्या दोन दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर अंडा बाजारात दर 3 ते 4 रुपयांवर येण्याची भीती अंडा व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

‘चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू हा माणसांना होत नाही’

देशभरात अनेक ठिकाणी बर्ड फ्लू झाल्यामुळे कावळे, कोंबड्या आणि अनेक पक्षी मरून पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशात आता चिकन किंवा अंडी खाल्यामुळे माणसांमध्येही हा रोग पसरले अशा बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी चिकन आणि अंड्यांकडे पाठ फिरवली आहे. मात्र, चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू हा माणसांना अजिबातच होत नाही. भारतात बर्ड फ्लू माणसांना झाल्याची आजपर्यंत एकही घटना घडलेली नाही. असं स्पष्टीकरण परभणीच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता नितीन मार्कंडेय यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात 1200 पक्ष्यांचा बर्ड फ्लूने घास घेतल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राज्य सरकारने पक्ष्यांना ठार करण्याचे आदेश दिले होते. त्यातच मराठवाडा बर्ड फ्लूचं केंद्र होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परभणी जिल्ह्यातील गावातून कोंबड्यांच्या कत्तलीला सुरुवात होणार आहे. जवळपास वीस पोल्ट्री फार्म्समधील 80 हजार कोंबड्या स्वाहा केल्या जाणार.

Share: