कोरोनावर प्रभावी मानले जाणारे रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या पाच जणांना अटक

5
0
Share:

कोरोनावर प्रभावी मानले जाणारे रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या पाच जणांना अटक

* 3 हजाराचे इंजेक्शन 25 हजार रुपयांना तर अन्य एक इंजेक्शन तब्बल 80 हजार रुपये किमतीत ही टोळी विकत होती

ठाणे : कोरोनावर प्रभावी मानले जाणारे रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार (Remdesivir Injection Black Market Racket) करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. 3 हजाराचे इंजेक्शन 25 हजार रुपयांना तर अन्य एक इंजेक्शन तब्बल 80 हजार रुपये किमतीत ही टोळी विकत होती .

देशात आणि महाराष्ट्रात कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव आणि मृत पावलेल्या लोकांची संख्या यामुळे कोव्हिडवर परिणामकारक ठरलेल्या Remdesivir आणि Tocilizumab ही दोन इंजेक्शन रक्षक ठरलेली आहेत. मात्र, त्याचा बाजारात तुटवडा आहे. दरम्यान, या इंजेक्शनचा काळाबाजार करुन 25 हजार आणि 80 हजार रुपयांचे इंजेक्शन विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक करुन रॅकेट उध्वस्त केले. त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात जीवांरक्षक औषधांचा काळाबाजार, अतिरिक्त पैसे घेणे असा गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे न्यायालयाने 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक अधिक तपास करत आहेत.
सध्या कोरोनावर परिणामकारक असलेली औषधं बाजारात कमी आहेत. त्यामुळे तुटवडा जाणवणाऱ्या Remdesivir आणि Tocilizumab ही दोन इंजेक्शनच्या मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे उकळण्याचा धंदा सध्या तेजीत आहे. तक्रारदारानुसार, 21 जुलै, 2020 वाजण्याच्या सुमारास रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ठाणे खंडणी विरोधी पथकाला वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची खातरजमा करीत संभावित तीन पेट्रोल पंप, नौपाडा भागात सापळा रचला. पोलीस पथकाने जीवांरक्षक इंजेक्शनसह तिघांना अटक केली. त्यांच्या अधिक चौकशीत औषधे पुरविणारे दोन आरोपी हे नवी मुंबई कामोठे येथे असल्याचे समजताच त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले

Share: