संत्रा आणि मोसंबी नुकसानाचा अहवाल द्या: चंद्रकांत पाटील

24
0
Share:

संत्रा आणि मोसंबी या पिकांना बहुवार्षिक पिकांमध्ये समावेश करून या पिकांचा नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
राज्यसरकार च्या वतीने २०१८ या वर्षातील खरीप हंगामातील दुष्काळग्रस्त भागासाठी मदत जाहीर करण्यात आली परंतु या मदतीतून कटोल, नरखेड तालुक्यातील संत्रा आणि मोसंबी या पिकांना वगळण्यात आले होते त्यामुळे या भागातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार होते.

ही बाब लक्षात घेता संत्री आणि मोसंबी पिकांचा बहुवार्षिक पिकात समावेश करून घ्यावा आणि मदत जाहीर करावी अशी मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे याच्यामार्फत कटोल पंचायत समिती सभापती संदीप सरोदे, विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर, नरखेड पंचायत समिती सभापती राजू हरणे यांनी केली. कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांनी या विषयावर भेट सुद्धा घेतली त्यानंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर येत्या दोन दिवसात संत्रा आणि मोसंबी पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.

Share: