परतीच्या पावसाचा राज्यभरात थैमान; शेतकऱ्यांची चिंता वाढली

9
0
Share:

पुणे ः परतीच्या पावसाने राज्यभरात चांगलाच थैमान घातला आहे. यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. तसेच अनेक गावाजवळील ओढ्याला पूर येऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले.

कोकणात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पावसामुळे भात शेतीत पाणी तुंबले आहे. त्यामुळे काढणी केलेल्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे भात पिकांसह, सोयाबीन, बाजरी, ऊस, कांदा, द्राक्षे, डाळिंब व भाजीपाला पिकांना चांगलाच फटका आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. काढणीच्या अवस्थेत असलेल्या बाजरी पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील सोयाबीन, कपाशी या मुख्य पिकाची चांगलीच धूळधाण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.

Share: