स्फोटकाचा वापर तोही मासेमारीसाठी नक्की कुठे होत आहे ते बघा

29
0
Share:

पवना नदीपात्रातील केजुबाई बंधाऱ्यामध्ये मृत मासे आढळल्याने पिंपरी शहरातील अस्वच्छ नदीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक कंपन्यांमधून प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले जाते.
मासेमारी करण्यासाठी प्रामुख्याने गळ किंवा जाळ्याचा वापर केला जातो. मात्र अलीकडे मोठ्या प्रमाणावर मासे मिळवण्यासाठी मासेमारी करणारे नवीन पद्धतीचा अवलंब करताना दिसून येत आहे. त्यासाठी धोकादायक अशा रसायनांचा वापर केला जातो. खोल पाण्यातील मासे पकडण्यासाठी पाण्यामध्ये रसायन सोडले जाते. त्यामुळे पाण्यातील आॅक्सिजन विरळ होतो. अशा वेळी खोल पाण्यातील मासे श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर येतात. पाण्यामध्ये
स्फोट करूनही मासेमारी केली जाते. गव्हाच्या कणकेमध्ये भुलीची पावडर टाकली जाते. मासे ती गोळी खातात. परिणामी माशांचा मृत्यू होतो.
स्फोटाद्वारे मासेमारी करण्याची नवीन प्रक्रिया आली आहे. ती घातक आहे. त्यामुळे संपूर्ण नदीपात्राचे पाणी प्रदूषित होत आहे. या पद्धतीने मासेमारी केलेले मासे माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहेत. यातून आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हा संभाव्य धोका प्रशासनाने ओळखून अशा प्रकारे मासेमारी करणाºयांवर कडक कारवाई केली पाहिजे.
– सोमनाथ मुसुडगे, अध्यक्ष, रानजाई संस्था, देहू

नदीपात्राच्या पाहणीदरम्यान अनेक नाले, मलनिस्सारण वाहिन्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. जागोजागी फुटलेल्या वाहिन्यांमुळे सांडपाणी एसटीपीपर्यंत प्रक्रिया होण्यासाठी पोहचत नाही याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना देण्यात आला आहे.
– हसन मुल्ला, आरोग्य निरीक्षक, पर्यावरण विभाग

Share: