शिवमहाआघाडी’च ठरलं!; सत्तास्थापनेचा असा असेल फॉर्म्युला

19
0
Share:

‘शिवमहाआघाडी’च ठरलं!; सत्तास्थापनेचा असा असेल फॉर्म्युला?
भाजपने संख्याबळाच्या अभावी सत्ता स्थापनेला नकार दिल्यामुळे आता राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असेलल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. निवडणुकीत भाजपला 105 तर, शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या 56 जागा मिळाल्या होत्या. आता शिवसेना सरकार स्थापन करणार हे निश्चित असून, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मदत घेणार आहेत.
काय घडले कसे घडले?
शिवसेना-भाजप युतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून फूट पडली. भाजपने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप शिवसेनेने केला. तर, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची चर्चा झाली नसल्याचं दावा भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले आणि संवादच संपुष्टात आला. त्यामुळं भाजपला आज, संख्याबळा अभावी सत्ता स्थापन करू शकणार नसल्याचं राज्यपालांना सांगावं लागलं. काल राज्यपालांनी सर्वांत मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. पण, आज भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी असमर्थ असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर अवघ्या तासाभरात राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते.
शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता कॉग्रेस ला या पदाची अपेक्षा 
सत्ता स्थापनेचा फॉर्म्युलाही ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेत थेट सहभागी होणार आहे. तर, काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विराजमान होतील असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Share: