शिवसेनेच्या नाराज नगरसेवकांचा मंदा म्हात्रेच्या नावाला पाठिंबा,नाराज नगरसेवकांनी घेतली मंदा म्हात्रे यांची भेट

19
0
Share:

नवी मुंबई: गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशा मुळे बेलापूर मतदार संघाचे तिकीट नक्की कोणाला मिळणार याबाबत संबधीत मतदार संघातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.ऐरोली मतदार संघ व बेलापूर मतदार संघाच्या दोन्ही जागा या भाजपला जाहीर झाल्यामूळे शिवसैनिक व कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजीचे वातावरण होते.तसेच बेलापूर मतदार संघात शिवसेनाचा उमेदवार असावा अशी आग्रही भूमिका शिवसेनेची होती.त्यामुळे नाराज होऊन शिवसेनेच्या ६० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता.

कारण बेलापूर मतदार संघातून शिवसेनेचे विजय नाहटा यांचही नाव शिवसेनेच्या माध्यमातून पुढे करण्यात आले होते. मात्र दोन्ही मतदार संघांची उमेदवारी ही भाजपला जाहीर झाल्याने शिवसैनिक नाराज होते.बेलापूर मतदार संघासाठी गणेश नाईक यांचे नाव डावलून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली..मंदा म्हात्रे यांच्या उमेदवारीला शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा आक्षेप नाही असे वक्तव्य मंदा म्हात्रे यांनी केले तसेच शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर, शिवराम पाटील, विलास भोईर व इतर कार्यकर्ते  यांनी मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावरून कुणाच्या नावाला शिवसेनेचा विरोध होता हे स्पष्ट झाले आहे.

Share: