धक्कादायक!नवी मुंबईत कोरोनामुळे 10 पोलीस कर्मचाऱ्याचा  मृत्यू

23
0
Share:
नवी मुंबई: शहर पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे.त्यामुळे शहर पोलीस दलातील मृत्यूची संख्या आता 10 वर गेली आहे.
 राजेंद्र बाळासाहेब खोत (वय 51)असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.खोत हे वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्यांचा पाश्चात पत्नी,मुलगा व मुलगी असा परिवार आहे.खोत यांच्या मृत्यूबाबत पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
18 सप्टेंबर रोजी नेरुळमधील डी वाय पाटील रुग्णालयात  कोरोना संसर्गामुळे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर आय सी यु मध्ये  उपचार सुरू होते उपचार सुरू असताना ते आज   सकाळी 6 बाजता  डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मध्ये आता पर्यंत 951 जणांना कोरोनाची लागण झाली असून 10 जणांची मृत्यू झाला आह.
तीन महिण्यात नवी मुंबई पोलीस दलातील 10 पोलीसना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,त्यापैकी 7 जणांच्या मृत्यू चालू महिण्यात झाला आहे,त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात व पोलीस बंदोबस्त दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचा सुरक्षाचे जबाबदारी घेतली जात आहे,त्यानंतरही अवघ्या तीन महिण्यात  10 पोलीस कर्मचाऱ्यांचे निधनाने नवी मुंबई पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाला आहे
Share: