धक्कादायक बातमी; कोरोनामुळे मुंबई APMC धान्य मार्केट निरीक्षक विनायक कांबळे यांचा मृत्यू

15
0
Share:

नवी मुंबई: मुंबई एपीएमसी धान्य मार्केट निरीक्षक विनायक कांबळे यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. कांबळे हे निरीक्षक म्हणून मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमध्ये रुजू झाले होते यापूर्वी ते भाजीपाला मार्केटमध्ये कार्यरत होते .कांबळे यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला आहे, यापूर्वी कांबळे यांच्या पत्नीचा 6 महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्या घरी मुलगा, मुलगी व 70 वर्षांच्या आई आहेत. कांबळे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रिपब्लिकन एमपल्याज फेडरेशने मुंबई एपीमसी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, कोरोनामुळे जे मृत्युमुखी झाले त्यांच्या परिवाराला 50 लाखाचा बिमा देण्यात यावा. तसेच त्यांच्या परिवारातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावीअशी मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती संघटनेचे उप सचिव लक्ष्मण गोडसे यांनी दिली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोना विषाणू विरुद्ध देत असलेल्या लढ्यात विनायक कांबळे यांनी आपल्या बहुमूल्य आयुष्याचा त्याग केला आहे. त्यांचे हे बलिदान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कधीही विसरणार नाही. त्यांच्या परिवाराच्या दुःखात संपूर्ण एपीएमसी परिवार सहभागी आहे. व यापुढे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी आपला सर्व एपीएमसी परिवार उभा राहील.

Share: