ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा आणि 1000 रुपये मिळवा शेतकऱ्यांची संतप्त भावना.

12
0
Share:

ठाणे: शहापूर तालुक्यात रोज पडत असलेल्या पावसाने नेहरोली, लेनाड, जांभे, शिरगाव, नडगाव, शेंदरून, आल्याणी या भागात भातशेतीचे पूर्ण नुकसान झाले असून लागवड केलेले भात खाली पडून पाण्यात कुजून गेले आहे तर खाली पडलेल्या भाताला नवीन कोंब फुटले आहेत.

कोरोनाच्या महासंकटात भातसाशेतीची लागवड केली आणि आज अवकाळी पावसाने व करप्या या रोगाने भातशेतीची अतिशय वाईट म्हणजे पेरलेले 50 किलो बियाणं सुध्दा मिळणार नाही त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे वेळीच शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी शेतकरी मागणी करत आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण मध्ये 100 % भात लागवड केली जाते शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला आहे, त्यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे.

मराठावाडा, विदर्भ, खानदेश, या भागात आमदार, खासदार, मंत्री यांचे रोज पाहणी दौरे चालू आहेत, ठाणे जिल्ह्यात ही पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु एकही आमदार, खासदार मंत्री शेतकऱ्याच्या शेतावर फिरकून ही पहात नाही.

लोकसभा – विधानसभेच्या वेळी मत मागण्यासाठी शहापूर तालुक्यात हप्त्यातून तीन – चार फेऱ्या मारणारे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कुठे लपून बसले आहेत हे समजतच नाहीत. शेतकरी राजा आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मात्र नाराजी व्यक्त करत आहे.

पालकमंत्री दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी चर्च्या आता शहापूर तालुक्यात जोर धरत आहे.

Share: