मल्टी लेवल मार्केटिंच्या नावाने फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक,5170 जणांकडून 18 कोटी 29 लाखाची रक्कम कंपनीकडे जमा झालेली होती

22
0
Share:

नवी मुंबई – मल्टी लेवल मार्केटिंच्या नावाने फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक. 400 दिवसात आठवड्याला 1 टक्का प्रमाणे मोबदला देण्याचे अमिश दाखवून लाखो रुपयांची गुंतवणूक करायला सांगायचे. त्यानुसार 5170 जणांकडून 18 कोटी 29 लाखाची रक्कम कंपनीकडे जमा झालेली होती.अटक केलेल्या सहा जणांवर सुमारे 18 गुन्हे दाखल आहेत.

गुंतवणूकीच्या रक्कमेवर एक टक्का दराने चारशे दिवस परतावा मिळेल अशी बतावणी करून 5 हजारपेक्षा अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या महाभागांच्या टोळीवर कारवाई करून भविष्यात होणारे मोठे नुकसान टाळण्यास नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे.यामुळे नवीमुंबईतील नागरीक समाधान व्यक्त करीत आहेत.
तुर्भे एम आय डी सी जवळील शरयू मोटर्स जवळील एस कर व्हील या इमारतीत एम ए पिक्चर्स नावाच्या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकीवर मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल असे असे सर्वसामान्य नागरिकांना अमिष दाखविण्यात येत आहे अशी माहिती गुन्हे शाखेला लागली असता नवी मुंबईतील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी आपल्या विभागाच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या त्याप्रमाणे संबधीत कंपनीच्या सेमिनारला हजर राहिले असता ही कंपनी बेकायदेशीर गुंतवणूक स्वीकारीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये ३ हजारांपासून ते १० लाखांपर्यत गुंतवणूक केल्यास दररोज एक टक्का दराने तब्बल ४०० दिवस परतावा मिळेल म्हणजेच केलेल्या गुंतवणूकीच्या 400 पट रक्कम मिळेल असे या सेमिनार मध्ये सांगण्यात आले. पोलिसांना मात्र या गुंतवणूक प्लान मध्ये काहीतरी काळबेर असावं असा संशय आला त्यानुसार त्यांनी सूत्र फिरवली. व त्यांनी कंपनीचे तसेच आरोपींच्या बँक खात्याची माहिती घेतली व ही खाती फ्रीज करण्यात आली आहेत.या कंपनीची चार बँक खाती असून सर्व खात्यात मिळून ७५लाख २८हजार ८२५ रुपये शिल्लक असल्याचे आढळून आले. तसेच जवळ २१ लाख ५ हजार रक्कम आढळुन आली ती जप्त करण्यात आली.
२९ सप्टेंबर या दिवशी कारवाई करण्यात आली त्यावेळी एम्बीव्हॅली लोणावणा पुणे येथे ५०० लोकांचे सेमिनार आयोजित करून दिवाळी धमाका या नावाने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास भाग पाडणार होते.मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे नागरिकांची भविष्यातील फसवणूक टळली आहे. तसेच कंपनी संचालक गणेश राजन भवनम (३४)केरळ, प्रवर्तक लोनाचन कुरिअकोसे कुरिअपरम (५०)ठाणे,किशोर रोकडे(५०)बेलापूर,अंकुश आहेर (४६)बेलापूर,एम एस रमेश(३४), बाबुराव माने(४९) कोल्हापूर यांना अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Share: