आत्तापर्यंत २७ लाख क्विंटल शेतमालाचा ई- नामद्वारे लिलाव

6
0
Share:

बाजारसमित्यांमधून शेतमालाच्या ऑनलाइन लिलावसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ऑनलाइन राष्ट्रीय अग्रीकल्चरल मार्केट (ई – नाम) अंतर्गत राज्यात सुमारे एक हजार कोटींच्या २७ लाख क्विंटल शेतमालाचा ऑनलाइन लिलाव झाला, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.
ई – नाम च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसभांमधून जनजागृती करण्याचे आदेश केंद्रसरकारने बाजार समित्यांना दिले आहे. त्यानुसार ६० बाजार समित्यांनी १ हजार ८१ ग्रामसभांचे आयोजन केले होते. यांमध्ये ६५ हजार ८८३ शेतकरी सहभागी झाले होते.या ग्रामसभेच्या संख्येत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे अशी माहिती राज्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले.

Share: