Sushma Swaraj : सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

12
0
Share:

नई दिल्ली:   देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं दु:खद निधन झालं आहे. मंगळवारी संध्याकाळी अचानकपणे त्यांच्या छातीत दुखायला लागल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे पाच डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती. मात्र, रात्री 11 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली.

सुषमा स्वराज यांची प्रकृतीबाबत माहिती मिळताच केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एम्समध्ये दाखल झाले होते. सध्या रुग्णालयात सुषमा स्वराज यांचे कुटुंबिय उपस्थित आहेत.

ANI

@ANI

Former External Affairs Minister & senior BJP leader, Sushma Swaraj, passes away.

View image on Twitter
2,321 people are talking about this

तीन तासांपूर्वीच सुषमा स्वराज यांनी जम्मू-काश्मीरवर मोदी सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं होतं. त्यांनी ट्वीट करत सरकारचं अभिनंदन केलं. ”पंतप्रधान मोदीजी तुमचं खूप खूप अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हा दिवस पाहाण्याच्या प्रतिक्षेत होती”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

Sushma Swaraj

@SushmaSwaraj

प्रधान मंत्री जी – आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी. @narendramodi ji – Thank you Prime Minister. Thank you very much. I was waiting to see this day in my lifetime.

27.9K people are talking about this

सुषमा स्वराज यांची संपूर्ण कारकीर्द (14 फेब्रुवारी 1953 ते 6 जुलै 2019)

2014 ते 2019 – परराष्ट्र मंत्री

मे 2014 ते जानेवारी 2016 – परराष्ट्र व्यवहार मंत्री

2009 ते 2014 – लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या

जानेवारी 2003 ते मे 2004 – संसदीय कामकाज मंत्री

जानेवारी 2003 ते मे 2004 – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 – माहिती व प्रसारण मंत्री

ऑक्टोबर 1998 ते डिसेंबर 1998 – दिल्लीच्या मुख्यमंत्री

मे 2009 ते मे 2019 – खासदार (विदिशा लोकसभा मतदारसंघ)

मे 1996 ते ऑक्टोबर 1999 – खासदार (दक्षिण दिल्ली)

सुषमा स्वराज या 1977 ते 1982 या काळात हरियाणा विधानसभेत आमदार होत्या. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी अंबाला कँटोनमेंट या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर त्या पुन्हा एकदा 1987 ते 1990 या काळात विधानसभेवर निवडून गेल्या.

1977 साली जुलैमध्ये देवी लाल यांच्या सरकारमध्ये सुषमा स्वराज यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. 1979 मध्ये त्यांच्यावर हरियाणाच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, जेव्हा त्यांचं वय केवळ 27 वर्षे होतं. हरियाणामध्ये त्यांनी शिक्षण मंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं.

केंद्रात आल्यानंतर सुषमा स्वराज या त्यांच्या झटपट कामासाठी ओळखल्या जाऊ लागल्या. परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सभेतील भाषण असो, किंवा पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेत सुरळीतता आणणं असो. सुषमा स्वराज यांनी आतापर्यंत अनेकांना फक्त एका ट्वीटवर मदत केली आहे.

Share: