काश्मीर पुलवामा येथे दहशतवादी हल्ला; हल्ल्यात CRPF चे तीस जवान शहीद

24
0
Share:

पुलवामा: आज पुलवामा येथे CRPF च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला असून केंद्रीय राखीव पोलीस बलाचे ३० जवान शहीद झाले आहे आणि ४० जवान जखमी झाले आहे. १९८९ नंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे कारण या हल्ल्यात मृत झालेल्या जवानांची संख्या इतर हल्ल्यापेक्षा मोठी आहे आणि हा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे या हल्ल्याची जबाबदारी जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा २०१६ नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, असे वृत्त ग्रेटर काश्मीर या स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे. हल्ल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Share: