दाना मार्केटच्या उप अभियंताची हलगर्जीपणा मुळे झाली चोरी,चोरट्याने फोडले तीन कार्यलय

21
0
Share:

दाना बाजारात तीन कार्यलये फोडली,सकाळी सातच्या सुमारास चोरीचा प्रयत्न

-दाना मार्केटच्या उप अभियंताची हलगर्जीपणा मुळे झाली चोरी

– दाना मार्केटचा उप अभियंतावर प्रशासन मेहेरबान.

नवी मुंबई :मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेतील दाणा बाजार मधील एम विंग मधील दुसऱ्या माळ्यावरील तीन व्यापाऱ्यांच्या कार्यालयाच्या दुकानात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला.पण दरवाजा काचेचा व त्याला थम्ब इम्प्रेशन असल्याने चोरट्याला चोरी करण्यास अपयश आले.मात्र चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.त्यानुसार एपीएमसी पोलीस तपस करत आहेत. दाना मार्केटच्या उप अभियंताची दुर्लक्षामुळेच चोरीचे प्रकार घडत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत सर्वच गेटवर सुरक्षारक्षक तैनात केलेले असतात.बाजार संपल्या नंतर सर्वच गेट कुलूप बंद केले जातात.परंतु काही ठिकाणी बोल असल्यामुळे चोरटे याचा फायदा उचलत असतात.असाच फायदा दाणा बाजार इमारतीच्या पाठीमागील भागात विद्युत मीटर लगत असणाऱ्या बोळातून घुसला व दुसऱ्या माळ्यावर असणाऱ्या तीन व्यपाऱ्यांच्या कार्यालयाचे लोखंडी सेटरचे कुलूप तोडले.पण कार्यालयात घुसताना काचेच्या दरवाज्याला थम्ब इम्प्रेशन असल्याने कार्यालयात चोरट्याला घुसण्यास अपयश आले व चोरीचा प्रयत्न असफल झाला.यासंदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाला असून पुढील तपास पोलीस सीसीटीव्ही मधील रेकॉर्डिंग पाहून करत आहेत.

 

Share: