नगरच्या शेतकऱ्याने जंगलातून कंदमुळे आणून उभे केले कर्टुल्याचे पीक

17
0
Share:

नगरच्या शेतकऱ्याने जंगलातून कंदमुळे आणून उभे केले कर्टुल्याचे पीक

कर्टुले ही जंगली वनस्पती आहे तिची शेती केली जात नाही मात्र अहमदनगर येथील पारनेर तालुक्यामधील निघोज गावात एका शेतकऱ्याने जंगलातून कर्टुल्याचे कंद आणून एक एकर पीक उभे केले आहे. त्यांनी पिकविलेल्या कर्टुल्याला मधुमेही रुग्णाकडून चांगली मागणी आहे.
ही वेलवर्गीय वनस्पती आहे कारल्यासारखा तिचा वेल आहे या वनस्पती ला बोरासारखी हिरवी फळे येतात या फळांमध्ये बिया असतात
निघोज येथील अमृता रसाळ यांनी जंगलात जाऊन कर्टुल्याचे कंद आणले आणि त्यापासून रोपे तयार केली नर आणि मादी अशी दोन्ही रोपे लावावी लागतात कर्टुल्याना अत्ता पर्यत 1 किलो माघे 300 रुपयांचा भाव मिळाला आहे.या फळांचा वास हा जंगली आहे हे फळ उपयुक्त असले तरी त्याची शेती मात्र केली जात नाही.चैत्र पालवीच्या काळात हवेत आद्रता वाढते. हवेतील आद्रता वाढली की या वनस्पती चे वेल जातात व फळे येतात . आद्रता संपेल तसे उत्पन्न कमी कमी होत जाते एकदा वेल तयार झाला की तो सात वर्षे टिकतो

Share: