पुणे वनविभागाची जागा गेली चोरीला वनविभागाने उचलला कारवाई चा बडगा

78
0
Share:

पुणे वनविभागाच्या परिक्षेत्रातील तब्बल २५५ हेक्टर जागा प्रशासनाने मागील वर्षभरात ताब्यात घेतली आहे. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या वनपरिक्षेत्रात अतिक्रमणांवर कारवाई केली. मुळातच वनविभागाच्या मालकीच्या असणाऱ्या या जागेत नागरिकांनी तारेचे कुंपन, दगडी सिमेंट रस्ता, विद्यूत वाहिनीचे खांब, पाण्याचे तलाव, गोठ्याचे शेड, कांदा साठवणुकीकरिता बराखी उभारल्या आहेत. तर काहींनी लोखंडी कपाऊंड, जनावरांकरीता गोठे, पाण्याचे हौद बांधले आहेत. अनेकांना ती जमीन स्वत:ची आहे समजून त्यावर बिनधास्तपणे बांधकाम करुन त्यावर मालकी हक्क सांगितल्याने सुरुवातीच्या काळात कारवाई करताना अधिकाऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. त्यातून वाद, बाचाबाची सारखे प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले आहे. साधारणत: १९८० नंतर वनविभागाच्या जमिन अधिग्रहण नियमानुसार कारवाई करताना मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. याशिवाय २००९ नंतर पुणे वनविभाग परिक्षेत्रातील जमिनींची माहिती वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध आहे. ही कारवाई करताना वनविभागाने एका खासगी संस्थेच्या सर्वेक्षणकर्त्यांकडून जमिन मोजणी केली. त्यांनी केलेल्या अचुक सर्वेच्या आधारे तसेच कागदपत्राची छाननी करुन दोषींवर कारवाई केली. मागील वर्षापासून सुरुवात झालेल्या या कारवाईत इंदापूर, बारामती, दौंड, वडगाव मावळ या वन परिक्षेत्रांचा समावेश आहे
जे शासनाचे आहे ते शासनाला परत द्या…
जी जमिन शासनाची आहे ती शासनाला परत देण्यात यावी. अशी विनंती वनप्रशासन नागरिकांना करत आहे. त्यात त्यांना दुखविण्याचा कुठलाही हेतु नाही. प्रशासनाच्यावतीने त्यांना पूर्ण सहकार्य करण्यात येते. कुठल्याही प्रकारची अरेरावी न करता सामंजस्याने जमिन ताब्यात घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांनी हे लक्षात घेऊन यापुढील काळात सहकार्य करावे.
– श्रीलक्ष्मी ए, उप वनसंरक्षक, पुणे विभाग

Share: