गणेश नाईक यांना पालिका सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फार्मूल ठरला.

19
0
Share:
रेश्मा निवडुंगे-एपीएमसी न्युज
नवी मुंबई:नवी मुंबई महापालिकेच्या एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. पालिकेच्या १११ प्रभागांपैकी शिवसेना ५०, राष्ट्रवादी ४० आणि शिल्लक २१ प्रभाग काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. यात १४ जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात  रस्सीखेच सुरू आहे.
नवी मुंबई पालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात होणार आहे. अगोदर बहुसदस्यीय पद्धतीने ठरलेली ही निवडणूक आता एकसदस्यीय पद्धतीने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी चार प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याठी शिवेसना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावर अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व जबाबदारी सोपविली आहे, तर शिवसेनेच्या वतीने उपनेते विजय नाहटा बाजू सांभाळत आहे. काँग्रेसच्या वतीने स्थानिक अनिल कौशिक यांनी या चर्चेतील बैठकांमध्ये रस घेतला आहे. नुकतेच भाजप चे कमळ हाथी घेतलेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांना पालिका सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या तीन पक्षांनी महाविकास आघाडी करण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे.
Share: