आनंदाची बातमी : मुंबई एपीएमसी मध्ये कामगारांची कोरोनाचे चाचणी.

21
0
Share:

 

-भाजीपला व फळ बाजारात जवळपास 4500 ते 5000 कामगारांची करोना चाचणी करण्यात आली.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यापारी, कामगार, कर्मचारी, माथाडी, मापाडी, वाहतूकदार, सुरक्षारक्षक यांची करोना तपासणी केली जात नव्हती म्हणून एपीएमसी मध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत होते याबाबतची वृत्त एपीएमसी न्युज वारंवार देत होती या बातमीची दखल घेत कोकण आयुक्त व एपीएमसी प्रशासनने कामगार आणि व्यापाऱ्यांची टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या होते त्यामुळे रविवारी सकाळी भाजीपला व फळ मार्केट मध्ये महापालिका रुग्णालय ,तेरणा आणि डी. वाय .पाटील रुग्णालयात 30 वैद्यकीय टीमने जवळपास 4500 ते 5000 परप्रांतीय कामगार,माथाडी कामगार ,एपीएमसी कर्मचारी,सुरक्षा कर्मचाऱ्यांना स्क्रीनिग टेस्ट करण्यात आली यामध्ये 59 जणांना कोरोनाचे लक्षण दिसल्याने त्याची स्वेब टेस्ट करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेची आरोग्य अधिकारी वंदना नारायणी यांनी दिली आहे .

एपीएमसी बाजारातील पाच बाजारपेठ आता करोना विषाणूच्या प्रादुर्भावासाठी हॉटस्पॉट झाल्या आहेत.पाचही बाजारपेठ मध्ये 48 कोरोना रुग्णच सापडली आहे त्यामुळे प्रशासन जाग झाली आहे . शासनाच्या आदेशामुळे या बाजारपेठेतील पाचही घाऊक बाजार सुरू आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी फळ बाजार सुरू करण्यात आला आहे. एपीएमसीने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करून हे बाजार खुले केले आहेत.बाजारात दरदिवशी कोरोना रुग्णची वाढत आहे याची बातमी एपीएमसी न्युज लावून ठेवले होते यामध्ये महत्त्वाचे बाब असे की एपीएमसी मध्ये प्रत्येक मार्केट मध्ये व्यापाऱ्याला व सुरक्षारक्षकाला करोना संसर्ग झाल्यामुळे बाजारातील सर्व घटकांचे धाबे दणाणले आहे. तो अनेक व्यापारी, अधिकारी, ग्राहकांच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक जणांना करोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या एपीएमसी मध्ये एकूण 48 कोरोना रुग्ण आढल्याने व्यापारी, कर्मचारी, कामगार, माथाडी, मापाडी आणि वाहतूकदारांमध्ये भीती पसरलेली आहे. त्यामुळे सर्वच घटकांची करोना चाचणी करून मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

रविवारी बाजार बंद असल्याने भाजीपला व फळ बाजारात प्रत्येक विंग मध्ये सोशल डिस्टन्स ठेवून कोरोनाचे चाचणी करण्यात आली यानंतर सर्व घटकांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार असल्याचे माहिती एपीएमसीचे प्रशासक व सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले. एपीएमसीतील धान्य, मसाला, कांदा, भाजी आणि फळ या पाचही बाजारांतील घटकांची तपासणी होणार असून या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासण्या महत्त्वाच्या असल्याचे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई एपीएमसीच्या फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये दुसरी मोठी झोपडपट्टी पाहायला मिळाली आहे. यामध्ये राहणाऱ्या हजारो कामगारांना आणि व्यापाऱ्यांची कुठल्याही प्रकारची कोरोना चाचणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे येथील परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होते आणि दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढत होते.धक्कादायक बाब अशी आहे की व्यापाऱ्यांनी भाजीपाला आणि फळ बाजारातील त्यांच्या कार्यालयात आणि गाळ्यांमध्ये परप्रांतीय कामगारांना आश्रय दिले आहेत. या कामगारांकडे माथाडी बोर्ड किंवा बाजार समितीचे कुठलेही ओळखपत्र नाही आणि ज्या व्यापाऱ्याकडे हे कामगार काम करतात त्यांच्याकडे त्यांची नोंदही नाही. बिन्धास्तपणे कामगार मार्केटमध्ये वास्तव्य करत असून मुक्तपणे फिरत होते. त्यामुळे बाजार आवरात समुह संसर्ग होण्याची दाट शक्यता दिसून येत होते आज भाजीपला व फळ बाजारात कामगारांना कोरोना चाचणी झाल्याने कामगारांना थोडाफार दिलासा मिळाली आहे .

Share: