मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

17
0
Share:

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती प्रशासनाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे भाजीपाला मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर समस्येकडे एपीएमसी प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

दोन दिवसांपासून भाजीपाला मार्केटच्या चौघे विंग आणि मार्केट परिसरमध्ये सडलेल्या भाजीपाला पडला आहे .भाजीपाला व्यापारी यांनी सांगितले प्रमाणे दोन दिवसांपासून साफसफाई झाली नाही सुट्टी असल्याने सफाई कर्मचारी आले नाहीत सवाल असे आहे सुटीच्या दिवशी ज्यावेळी व्यापार होऊ शकतो साफसफाई का नाही ? असे माहिती व्यापारी यांनी दिली आहे.

पूर्ण मार्केट परिसरात घाणीच्या साम्राज्य पसरलेले आहे.
एशिया खंडातील मोठ्या बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 400 ते 500 भाजीपाळाचे गाड्याची आवक होत आहे ,या मार्केट परिसर स्वच्छ ठेवणासाठी स्वच्छता अधिकारी नेमणूक करण्यात आली आहे .

स्वच्छतेचे नावाखाली बाजारसमितीकडून कोट्यवधी रुपये रुपये खर्च केला जातो पण मार्केट परिसरात सध्या दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.(Dirty in the Mumbai APMC vegetable market)मार्केटच्या चौघे विंग व रस्त्याच्या कडेला पडलेला भाजीपाला, फळांचे ढीग सडल्यामुळे ही दुर्गंधी सुटली आहे. समितीच्या कार्यालया लागत सुटलेल्या दुर्गंधीतून सुटका करण्याच्या प्रयत्नाकडे समिती कडून दुर्लक्ष होत आहे.

Share: