वर्क फ्रॉम होम’साठी आयटी क्षेत्राला फायदा होण्याची शकतात, सरकार नवी नियमावली आणण्याच्या विचारात.

Share:

नवी दिल्ली : कामगार मंत्रालयाच्या वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांच्या मसुद्याच्या कामांनुसार आयटी क्षेत्राला (IT Sector) अनेक फायदे मिळू शकतात. या आराखड्यात आयटी कर्मचार्‍यांना कामाचे तास माफ (Working hour) देखील होऊ शकतात. कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आराखड्यात तरतूद करण्यात आलीय. कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सेवा क्षेत्राच्या गरजेनुसार प्रथमच स्वतंत्र मॉडेल तयार केले गेलेय.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कार्यालयीन संस्कृतीत बराच बदल झालाय. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी घरातून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेलीय. त्यामुळे एकूणच वर्क फ्रॉम होम (Work from home) करण्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातंय. या अंतर्गत कर्मचारी आपले कार्यालयीन काम घरून करू शकतात. विशेष म्हणजे सरकार वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी नवीच नियमावली आणण्याच्या विचारात आहे. सरकार असे नियम आणण्याचा विचार करीत आहे, ज्या अंतर्गत कर्मचार्‍यांना घरातून कामाचा पर्याय निवडता येईल. कामगार मंत्रालयाने शुक्रवारी हा मसुदा जारी केला आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, खाण, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील कर्मचार्‍यांना नवीन कायद्याच्या मसुद्यात समाविष्ट केले जाणार आहे.
कामगार मंत्रालयाने नव्या औद्योगिक संबंध संहितेबाबत सामान्य लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. आपण आपल्या सूचना पाठवू इच्छित असल्यास आपण ते 30 दिवसांच्या आत कामगार मंत्रालयात पाठवू शकता. त्याचबरोबर कामगार मंत्रालय एप्रिलमध्ये हा कायदा लागू करू शकेल, अशी अपेक्षा आहे.
नवीन आराखड्यात सर्व कामगारांसाठी रेल्वे प्रवासाची तरतूदही करण्यात आलीय. पूर्वी ही सुविधा फक्त खाण क्षेत्रातील कामगारांसाठी होती. त्याचबरोबर नव्या प्रारूपात शिस्तभंग केल्याबद्दल शिक्षा देण्याची तरतूद आहे.

 

Share: