मुंबई Apmc भाजीपाला मार्केटमधील पत्र्याचे शेड कोसळले

23
0
Share:

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटच्या D विंगमधील पॅसेजमध्ये असलेलं पत्र्याचे शेड खाली कोसळले असून यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र हीच घटना जर सकाळी घडली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

पत्र्याचे शेड पडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यावर ठेवण्यात आलेला भाजीपाल्यांच्या क्रेट भार आणि त्यामुळे वजन जास्त झाल्याने ही शेड कोसळली. तसेच भाजीपाला मार्केटमध्ये व्यापारी हे अनधिकृतपणे गाळ्यांच्यावर मोठ्या प्रमाणात क्रेट ठेवतात, त्यामुळे अशी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. अनधिकृतपणे गाळ्यांवर क्रेट आणि पेड्यावर 5 ते 6 लोक एकत्र राहत असून त्याठिकाणी अस्वच्छतेचे प्रमाण ही वाढत आहे.

Share: