मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती बंद राहणार नाही. -सचिव व प्रशासक अनिल चव्हाण

18
0
Share:

मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती बंद राहणार नाही. -सचिव व प्रशासक अनिल चव्हाण

 -बाजार आवारात काम संपल्यावर त्वरित खाली करा-भाजीपाला व्यापारी महासंघ

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी आपापल्या स्तरावर 25 मार्च ते 31 मार्च पर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बाजार समिती बंद ठेवण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसल्याची माहिती बाजार समिती सचिन अनिल चव्हाण यांनी दिली आहे त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या तक्रार आल त्या व्यापारीवर बाजार प्रशासन कारवाई करणार।

सध्या सर्वत्र करोना विषाणू ची दहशत आहे. त्यामुळे बाजारातील व्यापारी हि धास्तावले आहेत. प्रत्येक बाजारात दररोज सरासरी हजार लोकांची ये जा असते. या लोकांमधून करोना विषाणूची लागण बाजार घटकांना झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न या निमित्तानं नेत्यांनी उपस्थित केला आहे. आणि 31 मार्च पर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय या पाच हि बाजारातील संचालकांनी आणि व्यापाऱ्यांनी मिळून घेतला आहे .आणि तसे जाहीर हि केले आहे.
पणन संचालकाकांकडून हि बाजार समित्या सुरु ठेवण्याच्या सूचना सर्व बाजार समित्यांना देण्यात आलेल्या आहेत. शिवाय महानगर पालिकांनाही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सुरु ठेवण्याबाबत चे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानुसार नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी हि बाजार सुरु ठेवण्याबाबत संबंधितांना कळवले आहे. मात्र असे असताना हि व्यापाऱ्यांनी बाजार समितीला कोणतीही कल्पना देता आपआपल्या स्तरावर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बाजार आवारात काम संपल्यावर त्वरित खाली करा.

भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कैलास तांजने व संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले की, गर्दीच्या ठिकाणी एकत्र आल्यास करोना चा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुले आरोग्याचा विचार करता सर्व व्यापरी, कर्मचारी ,रोखीचे कामगार, माथाडी, भाजी मार्केट मध्ये राहाणरा वर्ग मार्केट आवारात येण्यासाठी ज्या दुकानावर काम करता अथावा रहाण्यास आहात त्या मालकाचे ( परवानगी) सोबत आपले ओळखपत्र असल्या खेरीज आवारात काम संपल्या वर संचार बंदी असल्याने थांबता येणार नाही,कारण नसताना भाजी आवारात थांबता व वावरता येणार नाही असे पत्रक काढण्यात आला आहेत.

कमी पैशातील मजूर

बांगलादेशी नागरिकांना सहज नोकरी मिळत आहे. अत्यंत कमी पैशामध्ये बांगलादेशी काम करायला तयार होतात. यामुळे भाजीपाला व फळ बाजारात काही व्यापारी दिवसात त्यांच्या कडून काम करवतात आणि दुकानदार अनधिकृतपणे पेढ्यावर बांधण्यात आलेल्या रूम मध्ये भाडे घेऊन त्यांना ठेवतात .सध्या कोरोनाचे भित्तीमुळे बाजारातून 2 ते 3 हजार पळून गेल्याची माहिती मिळाली आहे आता बाजार आवारात हजारो आहेत वास्तविक विदेशी नागरिक असल्याचा संशय आल्यास किंवा खात्री पटल्यास पोलिसांना माहिती दिली पाहिजे. पण प्रत्यक्षात स्वत:च्या फायद्यासाठी बांगलादेशींना आश्रय दिला जात असून भविष्यात देशाच्या सुरक्षेसाठी धोका पोहचू शकतो अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता बैभव सावंत यांनी दिली आहे.

व्यापाऱ्यांच्या संघटनांनी बाजार बंद ठेवण्याबाबत ठरवले आहे मात्र त्या बाबत अजूनही बाजार समितीला अधिकृतपणे काही कल्पना देण्यात आलेली नाहीय त्यामुळे मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती बंद राहणार नाही. कुठल्याही प्रकारच्या तक्रार आली व्यापारी वर करवाइ करू.

– अनिल चव्हाण ,मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती सचिव व प्रशासक

Share: