मुंबई कृषिउत्पन्न बाजारसमितीचं दुर्लक्षित कारभार…

5
0
Share:

काल माथाडी कामगारांचा महामेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला राज्यातल्या कानाकोपऱ्यातून माथाडी कामगार उपस्थित होते. माथाडी कामगारांचे अनेक मेळावे हे नवी मुंबईतील कृषी उत्पन्नबाजारसमितीच्या कांदा बटाटा मार्केट मध्ये होतात त्या मार्केटच्या लिलाव सभागृहामध्ये ही सभा पार पाडत असते. या संपूर्ण कांदा बटाटा मार्केट ला सिडकोने २००५ साली धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे तरी सुद्धा कित्येक वर्षे याच सभागृहात या मेळाव्याचे आयोजन केले जाते आणि याच मंचावरून अनेक नेते मेळाव्याला संबोधित करतात ज्या ठिकाणी मंच आहे त्या मागच्या बाजूला लागूनच एक भिंत आहे ती भिंत देखील धोकादायक आहे ती भिंत देखील कधीही पडू शकते आणि त्यामुळे मंचावर उपस्थित राजकीय नेते असुद्या व माथाडी कामगार चे नेते याना जीव धोक्यात घालून या मेळाव्याला संबोधित करावं लागतं. या संपूर्ण प्रकरणासंबधी मुंबई कृषिउत्पन्न बाजारसमितीने सरासर दुर्लक्ष केले आहे आणि या मार्केट यार्डात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांवर मृत्यूची टांगती तलवार बाजारसमितीने ठेवली आहे.

Share: