एफआरपीची थकीत रक्कम ३८९२ कोटी शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा

5
0
Share:

साखर आयुक्तालयाने कारवाईचा बडगा उगारल्यनंतर गेल्या आठ दिवसांत साखर कारखान्यांनी ५ हजार ३२० कोटी रुपये थकीत एफआरपीच्या ऐंशी टक्के म्हणजेच ३ हजार ८९२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांना नोटिसा बजावल्यानंतर कारखान्यांनी थकबाकी जमा केली आहे.
साखर आयुक्तांनी ३९ कारखान्यंना जप्तीची नोटीस पाठविली होती. तर १३५ कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. या नोटिशीनंतर साखर उद्योगात अस्वस्थता निर्माण झाली. नोटीस पोचल्या पोचल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर पट्यातील जिल्हाधिकारी कार्यालये, तहसीलदार कार्यालये, साखर सहसंचालक कार्यालये यावर मोर्चा काढून रक्कम जमा करण्याविषयी आंदोलन केले. यामुळे कारखानदारांनी कारवाई टाळण्यासाठी एफआरपीची ऐंशी टक्के रक्कम जमा करण्यास प्रारंभ केला. ६४ कारखान्यांनी ७० टक्‍यांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. उर्वरित कारखान्यांच्या रक्कम जमा करण्याच्या प्रक्रिया जलद सुरू असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

Share: